
नागपूर : नागपूरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात केटरिंगच्या कामावरुन घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या माध्यरात्री 6 तारखेला मध्यरात्री 12.43 मिनिटांनी अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानेवाडा मार्गावर ही दुर्घटना घडली. अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरॅतही कैद झाली आहे.