नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

भाविकांसाठी विविध स्थानकावर थांबे
Railway
Railwaysakal

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी ६ ते ११ जुलैदरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

पंढरपूरला जाणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०१११५ नागपूर-मिरज आषाढी विशेष गाडी ६ आणि ९ जुलै रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८.५० वाजता प्रस्थान करणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज स्थानक गाठेल. ०१११६ मिरज-नागपूर आषाढी विशेष गाडी ७ व १० जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरज स्थानकावरून प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूर स्थानक गाठेल.

गाडीमध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन राहील. दोन्ही गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, राम, धरणगाव, दोरगाव, दौंड, रामगाव महांकाळ, सलाग्रे आणि अर्ग या स्थानकावर थांबा राहणार आहे.

गाडी क्रमांक ०१११७ नागपूर-पंढरपूर आषाढी विशेष गाडी ७ व १० जुलैला रात्री ८.५० वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करणार असून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता पंढरपूर गाठेल. यासह ०१११८ पंढरपूर-नागपूर आषाढी विशेष गाडी ८ व ११ जुलैला सायंकाळी ५ वाजता पंढरपूर येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूर स्थानकावर येईल. गाडीत दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन राहील. नागपूर-पंढरपूर-नागपूर आषाढी विशेष गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडुर्वाडी या स्थानकावर थांबा राहणार आहे.

गाड्यांसाठी बुकिंग सुरू

आषाढी विशेष गाड्यांची बुकिंग २७ जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु झाले आहे. चारही गाड्यांचे सामान्य द्वितीय श्रेणी डबे अनारक्षित राहणार आहेत. गाडीचा तपशील, वेळ व थांब्याबद्दल www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा एनटीईएस अ‍ॅप डाऊनलोड करावा. प्रवाशांना आषाढीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करताना कोविड मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे, अशी माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com