Paras Thermal Power Plant: पारस औष्णिक वीज केंद्राचा नवा विक्रम, २५० दिवसांपासून दिला अखंडित वीज पुरवठा

पारस महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वीज उत्पादनात कायम नावलौकिक राखत २५० दिवस अखंडीत वीज पुरवठ्याचा विक्रम केला आहे.
Paras
Paras Esakal

Paras Thermal Power Plant: अखंडित वीजपुरवठा करणे हे खूप जिकरीचे काम आहे. वादळीवारा व अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड होत असतात. मात्र, पारस महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वीज उत्पादनात कायम नावलौकिक राखत २५० दिवस अखंडीत वीज पुरवठ्याचा विक्रम केला आहे.

पारस महानिर्मितीच्या वीज केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग मागील २५० दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने वीज उत्पादनाच्या क्षेत्रात या संचाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पारस संच क्रमांक-३ च्या नावे या अगोदर अखंडित वीज उत्पादनाची १६६ दिवसांच्या विक्रमाची नोंद आहे.

संच क्रमांक ४ ने या २५० दिवसांत १२९०.४८१ मिलियन युनिटस आणि सरासरी २१५ मेगावॅटसह वीज उत्पादन केले आहे. महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात अखंडित वीज उत्पादनात चंद्रपूर येथील वीज केंद्र २१० मेगावाट संच क्रमांक ३ च्या नांवे सन २००९ मध्ये २६६ दिवसांच्या अखंडित वीज उत्पादनाच्या विक्रमाची नोंद आहे.(Latest Marathi News)

इंधन वापरावर ‘शून्य अस्वीकृती’

पारस वीज केंद्राने नोव्हेंबर-२०२३ (९०.२२), जानेवारी-२०२४ (९१.०२) आणि फेब्रुवारी-२०२४ (९५.५५) टक्के मासिक महाराष्ट्र वीज नियामक आयोग उपलब्धता घटक वर ‘शून्य नामंजूर’ लक्ष्य यशस्वीरीत्या साध्य केले आहे हे विशेष. केंद्राने २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी-२०२४ (९३.९७ टक्के) मध्ये सर्वाधिक मासिक केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक गाठले आहे. ऑगस्ट-२०२३ पासून मासिक विशिष्ट इंधन वापरावर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली आहे. या उत्तम कामगिरीबाबत महानिर्मिती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, संचालक-कार्यकारी संचालक वर्ग यांनी पारस मुख्य अभियंता आणि चमुचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Paras
Holi 2024 : होळी सेलीब्रेशन करा जरा हटके; बनवा खास ऋग्वेदात उल्लेख असलेला चविष्ट पदार्थ!

उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज असून, वीज केंद्रीची सर्व टिम अहोरात्र परिश्रम घेत आहे.- शरद भगत, मुख्य अभियंता, औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, पारस. (Latest Marathi News)

Paras
Moscow Concert Hall Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचं युक्रेनशी कनेक्शन? पुतीन सरकारचा आरोप; ११ जण ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com