Nagpur : महाराष्ट्र पेंचची मध्यप्रदेशला धोबीपछाड!

पहिल्या दहामध्ये पटकावले स्थान ः राज्यात प्रथम
Melghat Tiger Reserve
Melghat Tiger ReserveSakal

नागपूर : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यात मध्यप्रदेश पेंच प्रकल्पाला श्रेणीमध्ये मागे टाकत महाराष्ट्र पेंचने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेश पेंच मागील अहवालात पहिल्या क्रमांकावर होता. आज तो १३ व्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेल्या ‘द जंगल बुक’ मधील मोगली या पात्रामुळे पेंच जंगल जागतिक पातळीवर नावारूपास आले.

केरळमधील पेरियार व्याघ्रप्रकल्पाने ९४.३८ टक्क्यांसह देशात प्रथम स्थान मिळविले आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील सातपुडा आणि बंदीपूरचा क्रमांक लागतो. देशातील १२ व्याघ्र प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रवर्गात स्थान मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने ९०.९१ टक्के गुण प्राप्त करून आठवा क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट प्रवर्गामध्ये ताडोबा-अंधारी, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि बोर या प्रकल्पांचा समावेश आहे.

३३ निकषांचा समावेश

जंगलांच्या मूल्यमापनासाठी ३३ निकष ठरविण्यात आले होते. यामध्ये, व्याघ्र प्रकल्पातील कामांचे दस्तावेजीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, व्याघ्रसंवर्धन आराखडा, लोकसहभाग, अधिवास व्यवस्थापन, मानव-वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन, संसाधनांची उपलब्धता, आर्थिक संसाधने, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, जंगला भोवतालच्या लोकांच्या उत्पन्नाची साधने, जंगलातील गावांचे स्थानांतरण, कोअर भागातील पर्यटनावर आळा घालणे, आर्थिक व्यवस्थापन, वन्यप्राणांच्या संख्येवर झालेला परिणाम, व्याघ्रसंख्येतील बदल, पर्यटकांचे समाधान अशा विविध मुद्द्यांचा या निकषांत समावेश होता.

गुणांकाची तुलना

२०१८ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत मध्यप्रदेश पेंच (९३.७५ टक्के) पहिल्या क्रमांकावर होते. त्यात २०२२ च्या गणनेत ८८.०९ टक्के गुण मिळवीत १३ व्या स्थानावर घसरण झालेली आहे. पेंच महाराष्ट्राने २०१८ मध्ये ७६.५६ टक्के गुण मिळवून १६ वा क्रमांक मिळविला होता. त्यात १५ टक्के गुणांकाची सुधारणा होऊ ९०.९१ टक्के गुणांसह थेट आठव्या क्रमांकावर उडी घेत पहिल्या दहामध्ये आपला ठसा उमटविला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चांगले काम होत आहे. यापूर्वीच्या व्याघ्र प्रकल्प प्रमुखांनी केलेल्या चांगल्या कामाच्या आधारे आम्ही पुढे वाटचाल सुरू ठेवली. देशात आठवा क्रमांक मिळाला असून राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. यापेक्षाही वरचे स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा यशात वाटा आहे.

- श्रीलक्ष्मी, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com