esakal | नागपूरकरांना किडनीच्या आजाराचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

Kidney

नागपूरकरांना किडनीच्या आजाराचा धोका

sakal_logo
By
राजेश प्रायकर -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात केवळ १०२ सार्वजनिक शौचालये असून यात केवळ ७७३ सिट्स आहेत. शहराची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात असून महापालिकेने केवळ चार हजार नागरिकांमागे एकच सिट उपलब्ध करून दिली. स्मार्ट सिटीत प्रसाधनगृहे व त्यातील सिट्स अल्प असल्याने नागरिकांना मूत्र विसर्जनासाठी तासभर तरी प्रतीक्षा करावी लागत आहे. यातून शहरातील प्रत्येकच नागरिक, विशेषतः महिला किडनीच्या आजाराच्या कक्षेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

शहरात दररोज लाखो पुरुष, महिला नोकरी, खरेदी, भाजी खरेदीसह विविध कामांसाठी बाहेर पडतात. घरापासून गंतव्य ठिकाणी पोहोचताना अनेकांना लघवी लागते. त्यासाठी शहरात पुरेसे सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. परंतु शहरात १०२ सार्वजनिक शौचालये असून यात केवळ ७७३ सिट्‍स आहे. यात पुरुषांसाठी ४८८ तर महिलांसाठी २८५ सिट्‍स आहे. शहराची ३० लाख लोकसंख्येच्या शहरात ५० टक्‍क्यांपर्यंत महिला असूनही प्रसाधनगृहातील सिट्‍सच्याबाबत महापालिकेचा भेदभाव दिसून येत आहे. महिलांच्या बाबत विचार केल्यास १५ लाखांच्या संख्येमागे केवळ २८५ सिट्‍स आहे. अर्थात पाच हजार २६३ महिलांमागे एक सिट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. पुरुषांना लघवी लागल्यास ते तत्काळ गाडी थांबवून आडोशाला आधार घेतात. परंतु महिलांची मात्र अल्प प्रसाधनगृह व सिट्समुळे कोंडी होत आहे. यात काही पुरुषही उघड्यावर लघुशंकेला संकोच करतात. त्यामुळे गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना मूत्र विसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला रोखावे लागते. यातूनच किडनीच्या आजाराने ग्रस्त नागरिकांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा: बलात्कार पीडित मुलीचा संशयास्पद मृत्यू

किडनी खराब झाल्याने रुग्णाला खूपच त्रासदायक वेदनांमधून जावे लागते. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते दरवर्षी किडनीच्या आजाराने लाखो नागरिक ग्रस्त होतात. अनेक वर्षात महापालिका शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रसाधनगृहेही उपलब्ध करून देऊ न शकल्याने शहरातील नागरिक, विशेषतः महिलांना किडनीच्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिकेचे स्लम विभागाचे अधिकारी अविनाश बारहाते यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

रस्त्यांवरील बाजारांमध्ये समस्या

महापालिकेच्या मोजक्याच बाजारात प्रसाधनगृहे आहेत. कोरोनाच्या काळानंतर शहरात हिवरीनगर, संजय गांधीनगरसह अनेक भागात रस्त्यांवर बाजार सुरू झाले आहेत. या बाजारांमध्ये कुठलीही सुविधा नाही. विक्रेत्या महिला तसेच खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही प्रसाधनगृहाची सुविधा नसल्याने त्यांना असुविधेचा भार सहन करावा लागत आहे.

युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनची शक्यता

अनेकदा जोरात लघवी लागल्यानंतर ती रोखून धरल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात मूत्र मार्गात संक्रमणाचा महिलांना अधिक धोका आहे. मूत्रमार्गातील इन्फेक्शन किडनीतही प्रवेश करू शकतात. लघवी लागल्यानंतर विलंब केल्यास पुन्हा ती किडनीकडे जाते. ही किडनी स्टोन होण्याची सुरवात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: महाविकास आघाडीतील नेते मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

सामाजिक संस्थांनी प्रसाधनगृहांसाठी पुढाकार घेतला होता. परंतु झोनकडून जागाच उपलब्ध झाल्या नाही. त्यामुळे प्रसाधनगृहे झाली नाही. मात्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी शौचालये बनवून देण्यात आली. सामुदायिक शौचालयांची संख्या कमी झाली.

- डॉ. गजेंद्र महल्ले, नोडल अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन.

दृष्टीक्षेपात उपराजधानी

३० लाख लोकसंख्या

१०२ सार्वजनिक शौचालये

केवळ ७७३ सिट्‍स आहे.

सिट्‍स

पुरुषांसाठी - ४८८

महिलांसाठी - २८५

loading image
go to top