esakal | नागपूर : बलात्काऱ्याची जामिनावर सुटका; अल्पवयीन पीडितेची नैराश्यातून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटीची भिंत पडल्याने एकाचा मृत्यू

नागपूर : बलात्काऱ्याची जामिनावर सुटका; अल्पवयीन पीडितेची नैराश्यातून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दोन महिन्यांपूर्वी १६ वर्षीय मुलीवर मावसभावाने बलात्कार केला होता. तो आरोपी कारागृहातून सुटून येताच बलात्कार पीडित मुलीचा तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हे प्रकरण संशयास्पद आहे. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेच्या तपासावर मात्र, प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित मुलगी खुशबू (काल्पनिक नाव) जरीपटक्यात राहते. ती दहावीची विद्यार्थिनी होती. तिच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. खुशबूच्या वडिलांनी पहिल्या पत्नीला सोडून दुसरीशी लग्न केले. पहिल्या पत्नीकडून खुशबू आणि एक मुलगा आहे. दुसऱ्या पत्नीला मूलबाळ नसून दोन्ही मुले वडिलांसह राहतात. दुसऱ्या पत्नीच्या मोठ्या बहिणीचा मुलगा वारंवार घरी येत होता. त्याची वाईट नजर मावस बहिण खुशबूवर गेली. त्याने खुशबूशी जवळिक साधत जाळ्यात ओढले. तिच्याशी सलगी केली. त्यानंतर घरात कुणीही नसताना खुशबूशी तो अश्‍लील चाळे करीत होता. तसेच तिला तो शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होता.

हेही वाचा: महाविकास आघाडीतील नेते मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

दोन महिन्यांपूर्वी त्या युवकाने मावसबहिण खुशबूवर बलात्कार केला. खुशबूने भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर जरीपटका पोलिस ठाण्यात मावसभावावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तो मध्यवर्ती कारागृहात गेला. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटून बाहेर आला. १३ सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरातील स्टोअर रूममध्ये कसरत करायच्या लोखंडी ॲंगलला ओढणीने खुशबूचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी जरीपटका पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांना घाईघाईत आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; DA,DR मुळे वाढला HRA

आत्महत्या की घातपात ?

खुशबूच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली. खुशबूच्या गळ्यातील ओढणीची गाठ मागे नव्हती तर ती गळ्याजवळ होती. खुशबूचे पाय खाली टेकून होते. त्यामुळे खुशबूने आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला, अशी चर्चा जरीपटक्यात रंगली आहे. या प्रकरणाकडे थेट पोलिस आयुक्तांनी लक्ष घातल्यास सत्य समोर येऊ शकते.

loading image
go to top