Nagpur : फार्मा उद्योगांसाठी नागपुरात ‘रेड कार्पेट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nagpur : फार्मा उद्योगांसाठी नागपुरात ‘रेड कार्पेट’

नागपूर : नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून येथे उत्तम कनेक्टिव्हिटीसह भरपूर लॉजिस्टिक सुविधा आहेत. त्यामुळे फार्मा उद्योगांच्या क्लस्टरसाठी येथे मोठ्या संधी असून शहरात त्यासाठी ‘रेड कार्पेट’ असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

यांनी ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेसमध्ये फार्मा कंपन्यांचे सीईओ कॉन्क्लेव्हमध्ये ते विविध कंपन्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी विविध कंपन्यांच्या सीईओंनी त्यांना फार्मा उद्योगात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली. भारतीय बाजारात औषधांची निर्मिती आणि संशोधनात येत असलेल्या अडचणी विशद केल्या. एसीजी कॅप्सूल ॲन्ड ड्रग्जचे अजितसिंग यांनी देशात संशोधनासाठी सवलती देण्याचे आवाहन केले.

काही उद्योजकांनी अभियांत्रिकी आणि इतर उद्योजकांच्या माध्यमातून क्लस्टर उद्योग तयार करून त्यातून मेडिसिन टुल्स तयार करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, सेझमध्ये जमीन, पाणी, वीज आणि औद्योगिक क्लस्टरच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिंदी ड्राय पोर्ट, समृद्धी महामार्गची उपलब्धता यामुळे नागपूरला अनेक दृष्टीकोनातून व्यवहार्य बनवले आहे.

औषध उद्योगांनीही येथे आपले क्लस्टर स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. यावेळी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी आपल्या समारोपाच्या टिप्पण्यांमध्ये सरकारद्वारे ऑफर केलेल्या व्यवसाय सुलभतेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नितिका प्राईस फार्मास्युटिकल्सचे सीईओ रवलीन सिंग खुराना यांनी सीईओ कॉन्क्लेव्हचे संयोजन केले. यांच्यासह भारत बायोटेकचे कृष्णा इला व विविध कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते.