Nagpur Police AI System Registers FIR in 2 Minutes
esakal
नागपूर : पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना पूर्वी कधी अर्धा तास तर कधी तासभर प्रतीक्षा करावी लागत असे. कागदपत्रे तपासणे, संगणकावर माहिती टंकणे आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तक्रारदारांची गैरसोय होत असे. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नव्या प्रणालीमुळे हीच प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होत असून पोलिस ठाण्यांतील कामकाज अधिक वेगवान झाले आहे.