रेकी प्रकरणानंतर नागपूर सतर्क, RSS मुख्यालयासह इतर ठिकाणी फोटो- व्हिडिओ काढण्यास मनाई

नागपूर पोलिसांनी रेकी प्रकरणाकडे गांभीर्यतेने घेत महत्त्वपुर्ण निर्णय घेतलाय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयसकाळ डिजिटल टीम

नागपूर : कथित दहशतवादयांकडून नागपुरातील महत्वाच्या स्थळांची रेकी करण्याची बाब समोर आल्याने आता पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्यतेने घेत महत्त्वपुर्ण निर्णय घेतलाय. संघ मुख्यालयासह विमानतळ, आरबीआय इमारत आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यास करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले. यासंबंधी सहपोलिस आयुक्तांनी आदेश दिले. Nagpur Police have banned taking photographs and videos of the important places including the RSS headquarters. )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय
'मातोश्री'ला २ कोटी आणि ५० लाखांचं घड्याळ, छाप्यात जाधवांची डायरी सापडली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयाची व अन्य स्थळांची दहशतवाद्यांकडून रेकी केली जात असल्याची बाब समोर आली होती. रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस आणि एनआयए संयुक्तपणे करत आहे. आता या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्यतेने घेत संघ मुख्यालयासह विमानतळ, आरबीआय इमारत आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी घेण्यास मनाई केली आहे. सोबतच असे केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. यासंदर्भात सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांनी आदेश काढले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय
गाईच्या पोटातून १५ किलो प्लास्टिक काढले बाहेर

बाँब पेरणे, गोळीबार करणे, स्फोट घडवणे, आत्मघाती हल्ला करणे अशा दहशतवादी हल्ला उधळून लावण्याची आमची तयार आहे. नागपूर पोलीस सतर्क असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. डिसेंबर 2021 मध्ये नागपूर पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना रेकीचे इनपूट दिल्यानंतर फोर्स वन आणि एनएसजी कमांडो नागपुरात आले होते. हल्ला कसा परतवून लावायचा याचा सराव केला. ही दोन्ही पथके सात दिवस नागपुरात मुक्कामी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com