नागपूर : IPL ऑनलाइन सट्टा; तीन बुकींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Police Online IPL betting Three bookie arrested

नागपूर : IPL ऑनलाइन सट्टा; तीन बुकींना अटक

नागपूर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन खायवाडी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने सतरंजीपुरा भागातून रंगेहात अटक केली. प्रसन्न ऊर्फ बबलू राजकुमार जैन (५२) रा. सतरंजीपुरा, गजेंद्र नामदेवराव भिसीकर (५६) रा. जलालपुरा आणि नीरज कन्हैयालाल आमेसर (३०) रा. छापरूनगर चौक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा साथीदार मस्कासाथ येथील रहिवासी बोमा ऊर्फ आशीष कुबडे पळून जाण्यात यशस्वी झाला.

शहर क्रिकेट बुकींसाठी हब बनले आहे. क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. यावर पोलिसांचे कारवाई सत्र सुरू असले तरी ऑनलाइन सट्टा काही कमी झाला नाही. सतरंजीपुरा भागात चारही आरोपी आयपीएलच्या सामन्यांवर खायवाडी करीत होते. पोलिसांची भीती असल्याने एका ठिकाणी बसून बुकिंग घेण्यापेक्षा मोकळ्या भागात फिरून मोबाईलवरच ते सर्व व्यवहार करीत होते. गुरुवारी रात्री ते सतरंजीपुरा येथील गुडलक वाइन शॉपमागील पान ठेला परिसरात बसले होते.

तिथूनच त्यांचा व्यवहार सुरू होता. याबाबत गुन्हेशाखा पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तिघांना पकडले. पोलिसांची चाहूल लागताच बोमा पळून गेला. ताब्यातील आरोपींकडून ३२ हजार ७०० रुपये रोख, मोबाईल व वाहनांसह एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोबाईलवर खायवाडीचे पुरावे मिळाले असून त्या आधारे पैसे लावणाऱ्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Nagpur Police Online Ipl Betting Three Bookie Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top