नागपूर : न्यायालयाच्या इमारतीला बंदीवानांचे हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Prisoners

नागपूर : न्यायालयाच्या इमारतीला बंदीवानांचे हात

नागपूर : केलेल्या गुन्ह्यापायी तुरूंगात शिक्षा भोगत असताना बंदिवानाकडे जी कला असते त्याचा उपयोग समजाला होत असतो. विणकर असेल तर कापड तयार करणे, सुतारकाम येत असेल तर फर्निचर तयार करण्याचे काम त्यांच्याकडून तयार करवून घेतल्या जाते. अशाच बंदिवानांनी तयार केलेल्या फर्निचरने जिल्हा न्यायालयाची इमारत सजणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाची ही नवी इमारत तयार झाली असून त्यातील फर्निचर राज्यातील विविध कारागृहातील बंदीवानांनी तयार केले आहे.

आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालय त्याला कारागृहात पाठवीत असते. कारागृहात विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना सुधारण्याची संधी देत त्यांच्याकडून विविध कामे करवून घेतली जातात. अशाच बंदिवानांकडून तयार करण्यात आलेले फर्निचर आता न्यायालयात वापरले जात आहे. यात राज्यातील नागपुरातील मध्यवर्ती कारागृहासह येरवडा (पुणे), कोल्हापूर आणि नाशिक येथील कारागृहाला हे कंत्राट देण्यात आले.

या कारागृहातील बंदीवानांनी तयार केलेले फर्निचर जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीत वापरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. बार रूम आणि इमारतीमधील न्यायालयाच्या इमारतीला बंदीवानांचे हात सभागृह वगळता सर्व न्यायालयीन कामकाजासाठी लागणारे फर्निचर बंदीवानांनी तयार केले आहे, हे विशेष. गेल्या काही वर्षांपासून नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या या बांधकामासाठी राज्य सरकारने सुरवातीला ९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.

सहा कोटी रुपयांचा निधी खर्चून हे फर्निचर तयार करण्यात आले आहे. चार मजल्याचे फर्निचर आजवर प्राप्त झाले असून उर्वरित चार मजल्यावरचे फर्निचर लवकरच प्राप्त होईल.

- ॲड. कमल सतुजा, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, नागपूर.

Web Title: Nagpur Prisoners Made Wooden Furniture In Jail For Court Building

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..