

Nagpur Extortion Case
esakal
नागपूर : रुग्णाच्या मृत्यूनंतर कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची तसेच रुग्णालय पाडून टाकण्याची धमकी देत १२ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी शिवसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख शरद सरोदे (वय ४५), महिलाप्रमुख मनीषा पापडकर (वय ४०), मुल्ला सिंह गौर (वय ४०), प्रतीक बहुगुणा (वय ४०), पंकज खिची (वय ४०), महेश ढोले (वय ३०), शुभम साठे (वय २५) अशी आरोपींची नवे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील विठ्ठल साठे हे ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल होते. ५ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर काही जणांनी रुग्णालय व्यवस्थापनावर दबाव आणत प्रकरण मिटविण्यासाठी १२ लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. रक्कम न दिल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची, रुग्णालय पाडून टाकण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. याप्रकारानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने पाचपावली पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक पुरी निलंबित रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांना धमकी देऊन १२ लाखांची खंडणी मागणाऱ्यांविरोधात सबळ पुरावे सादर करूनही कायदेशीर कारवाई न करता कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत पाचपावलीचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांच्यावर गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई करताना सर्व अधिकाऱ्यांच्या देखत यापुढे कर्तव्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिल्याने पोलिस दलाचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.