Ramai Awas: साहेब, घर बांधायचे कसे? घरकुल अनुदानाच्या रकमेत ग्रामीण आणि शहरीमध्ये दुजाभाव; ग्रामस्‍थांना फक्‍त दीड लाख

राज्य शासनाच्या वतीने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अडीच लाख तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दीड लाख अनुदान देण्यात येते.
साहेब, घर बांधायचे कसे? घरकुल अनुदानाच्या रकमेत ग्रामीण आणि शहरीमध्ये दुजाभाव; ग्रामस्‍थांना फक्‍त दीड लाख
Ramai Awas Gharkul YojanaEsakal

Ramai Awas Yojana Grant Money: घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यासह मजुरीचा दर ग्रामीण भागासह शहरी भागात देखील समसमान आहे. मात्र राज्य शासनाच्या वतीने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अडीच लाख तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दीड लाख अनुदान देण्यात येते. घरकुलाच्या अनुदानासाठी ग्रामीण व शहरी असा दुजाभाव का? करण्यात येत आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना पक्के मजबूत घर मिळावे, यासाठी रमाई आवास योजना राबविली जाते. तसेच अनुसूचित जमाती घटकासाठी शबरी योजना व इतर घटकासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. घर बांधण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना या योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे अनेक गोरगरिबांचे मजबूत पक्के घरांचे स्वप्न साकार झाले आहे.

तसेच पारधी आवास व भटक्या प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना राबविली जाते.या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. हा मिळणारा निधी लाभार्थ्यांना टप्याटप्याने दिला जातो. पण सध्याचे घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर बघता ते गगनाला भिडले आहेत. लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न पूर्णत्वास येत असले तरी दीड लाखात घर कसे बांधावे? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडतो आहे.

निधीअभावी घरकुलांची कामे अर्धवट

रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेले अनेक घरकुलांची कामे अर्धवट आहेत. जिल्हा तसेच तालुका प्रशासनाने वाळू धक्क्यांचे लिलाव केले नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना वाळू ही वाजवीपेक्षा जास्त दरात घ्यावी लागत आहे. तालुक्यातील भागात मिळणारी काळी वाळू मिळत नसल्याने कन्हान नदीवरून येणाऱ्या वाळूशिवाय लाभार्थ्यांना पर्याय राहिला नाही. या वाळूचे दर हे गगनचुंबी आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना किमान ४ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी.(Latest Marathi News )

ग्रामीण भागातही द्यावे अडीच लाखांचे अनुदान

वास्तविकतेत घरकुल बांधकाम करताना शहरी व ग्रामीण भाग समानच आहे. याशिवाय ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना बांधकामासाठी लागणारी मजुरीदर, साहित्य, किरकोळ सामान हे एकाच दरात घ्यावे लागते. असे असताना ही राज्य शासनाच्या वतीने मात्र ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांमध्ये दुजाभाव केला जातो आहे. त्यामुळे राज्य शासनाने लक्ष देऊन शहरी व ग्रामीण हा भेदभाव दूर करून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनाही अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी नरखेड तालुक्यातील लाभार्थ्यांकडून होत आहे.

साहेब, घर बांधायचे कसे? घरकुल अनुदानाच्या रकमेत ग्रामीण आणि शहरीमध्ये दुजाभाव; ग्रामस्‍थांना फक्‍त दीड लाख
Brij Bhushan Singh case: ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय

घराला लागणाऱ्या साहित्याचे दर

लोखंड १०० किलो ५८०० रुपये

विटा - १००० हजार ७५०० रुपये

सिमेंट प्रति बॅग- ३७०

गिट्टी दोनशे फुटासाठी ४८०० ट्रक

वाळू एक ब्रास ८००० (Latest Marathi News )

साहेब, घर बांधायचे कसे? घरकुल अनुदानाच्या रकमेत ग्रामीण आणि शहरीमध्ये दुजाभाव; ग्रामस्‍थांना फक्‍त दीड लाख
Gourav Vallabh: संबीत पात्रांना शून्याचा हिशोब शिकवणारा काँग्रेस प्रवक्ता भाजपमध्ये, कोण आहेत गौरव वल्लभ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com