नागपूर : शिवसेनेवर शिंदेसेना ठरली वरचढ

पहिल्याच बैठीत अडीचशेवर शिवसैनिक उपस्थित; पक्षात उभी फुट
Ramtek MP Kripal Tumane meeting
Ramtek MP Kripal Tumane meeting

नागपूर : रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या झालेल्या पहिल्याच बैठकीत सुमारे अडीचशे शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेते मोठी फूट पडल्याची स्पष्ट झाले आहे.

तुमाने आज दिल्लीहून नागपूरला परतले. नागपूर विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर सोमलवाडा येथे तुमाने यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम धोटे, संघटक नंदकिशोर दंडारे, रामटेकचे बिकेंद्र महाजन, कुहीचे सचिन पुंडके, माजी जि.प. सदस्य नरेश धोपटे, महेंद्र भुरे, सुत्तम मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी रविभवन येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठककीत तुमाने यांना गद्दार ठरवण्यात आले होते.

त्यांचा सुबोध मोहिते करू असे असाही इशारा देण्यात आला होता. त्याबैठकीला शेदीडशे शिवसैनिक उपस्थित होते. तुमाने आणि जयस्वाल यांच्यासोबत कोणी गेले नाही असाही दावा केला जात होता. मात्र, तुमाने यांच्या बैठकीला दोनशेच्यावर शिवसैनिक उपस्थित असल्याने शिवसैनिकांमधील अस्वस्थता वाढली आहे. तुमाने यांच्या समर्थकांनी बैठकीला आम्ही मोजकेच आलो. अनेकांनी मुद्दामच निरोप दिले नव्हते. जेवढे बैठकीला आले त्यापेक्षा जास्त बाहेर आहेत, असा दावा त्यांनी केला. एकूणच शिवसेनेत झालेल्या दोन गटामुळे भविष्यात शिवसैनिकांमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय समित्या, मंडळांवर करणार नियुक्त्या

शिंदेसेनेच्या समर्थकांना बळ देण्यासाठी त्यांनी शासकीय समित्या, मंडळावर नियुक्ती केली जणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांना थोपण्यासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com