

Nagpur Shocker Youth Killed in Slipper Dispute, Four Arrested (1)
esakal
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात किरकोळ वादातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चप्पल अदलाबदलीच्या गैरसमजातून निर्माण झालेल्या वादाने इतका विकोप घेतला की, दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी विटा आणि काठ्यांनी हल्ला चढवून तरुणाचा जीव घेतला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.