Ramzan: रमझानच्या महिन्यात शेवयाप्रेमींना महागाईचा फटका; तेल, तूप, मैदा महागल्याने गोडवा हरवला

इस्लामी कालगणनेतील रमझान महिन्याला सुरुवात झाली असून यासाठी मोमिनपुऱ्यातील बाजारपेठही सज्ज झाली आहे. रमझानपूर्वी शेवयांचा बाजार सजला असला तरी यंदा महागाईचे सावट दिसत आहेत.
Ramzan
Ramzan Esakal

Ramzan Celebration: इस्लामी कालगणनेतील रमझान महिन्याला सुरुवात झाली असून यासाठी मोमिनपुऱ्यातील बाजारपेठही सज्ज झाली आहे. रमझानपूर्वी शेवयांचा बाजार सजला असला तरी यंदा महागाईचे सावट दिसत आहेत. खाद्यतेल, मैदा, कारागिरांची मजुरी, इंधन आणि तुपाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेवयांच्या दरात २० टक्के वाढ झालेली आहे.

भूजी बारीक शेवया, डबल फ्राय, बनारसी शेवयांना बाजारात मोठी मागणी आहे. रमझान सुरू होण्यापूर्वी मोमिनपुरा परिसरातील बाजारात शेवयांची दुकाने सजू लागतात. या काळातच विविध रंगांच्या अनेक प्रकारच्या शेवया बाजारात मिळतात. शहरातील पाच ते सहा ठिकाणी शेवया तयार करणारे कारखाने आहेत. त्यात दररोज मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या शेवया बनतात.

शेवया खरेदीसाठी आलेला आदिल अमीन सांगतो की, रमझानच्या महिन्यात सर्व स्तरातील लोक घरी येतात. रोजा इफ्तारीपासून ते ईदपर्यंत लोकांची सतत वर्दळ असते. याशिवाय मध्यप्रदेश आणि विदर्भातील नातेवाइकाकडेही येथील शेवया पाठविण्यात येतात.

शहरात ५० हजार किलो शेवया बनतात

सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने खरेदीसाठी बाजारात वर्दळ कमी आहे. अजून सात दिवसांचा अवधी असून येत्या दोन ते तीन दिवसानंतर वर्दळ वाढणार आहे. नागपूर हे शेवयांचे हब आहे. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात शेवयांचा पुरवठा होतो. शहरात पाच ते सहा ठिकाणी शेवळ्या तयार करण्यात येतात. ते कारागीरही बनारस येथून येतात. ते दररोज अंदाजे १८०० किलो शेवळ्या तयार करण्याचा अंदाज आहे. रमझान काळात शहरात ५० हजार किलो शेवयांची विक्री होत असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. शेवयांची मागणी एवढी असते की आम्ही त्याची पूर्तताही करू शकत नसल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Ramzan
मोची समाजाच्या विकासात अडथळा; जातीच्या दाखल्यासाठी १९५० च्या पुराव्याची अट

मैदा, कारागिरांची मजुरी, तेल आणि तुपासह इतरही कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे रमझानच्या पार्श्वभूमीवर शेवळ्या आणि फेण्याच्या दरात २० टक्क्यांच्या जवळपास वाढ झालेली आहे. १३० ते १४० रुपये किलो असलेल्या डबल फ्राय शेवळ्या आणि इलाहाबादी शेवळ्या १६० रुपये तर साध्या शेवळ्या ६५ रुपयांवरून ८० रुपये किलो झालेल्या आहेत.

- युसूफ अहमद, संचालक, अल हफीज फेनी भंडार.

Ramzan
IIT Bombay: धक्कादायक! आता IIT मध्येही नोकरीची गॅरंटी नाही; 36 टक्के विद्यार्थी नोकरी पासून वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com