रश्मी बर्वेंचा काँग्रेसने अपमान केला, उदय सामंत यांचा आरोप
nagpuresakal

Uday Samant: रश्मी बर्वेंचा काँग्रेसने अपमान केला, उदय सामंत यांचा आरोप

रामटेकच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. ते अवैध ठरवले जाऊ शकते याची आधीच कल्पना काँग्रेसला होती.

Nagpur Uday Samant on Rashmi Barve: रामटेकच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. ते अवैध ठरवले जाऊ शकते याची आधीच कल्पना काँग्रेसला होती. त्यानंतरही त्यांनाच उमेदवारी देऊन काँग्रेसने एका महिला उमेदवाराचा अपमान केल्याचा आरोप राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.

काँग्रेसला रश्मी बर्वे यांना उमेदवारी द्यायचीच नव्हती. म्हणून आधीच दोन अर्ज भरण्यात आले होते. श्यामकुमार बर्वे यांच्या अर्जासोबत बी फॉर्मसुद्धा जोडण्यात आला होता. आता भाजपनेच हे घडवले असे सांगून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेसच्यावतीने केला जात आहे. खरेतर काँग्रेसचेच हे षडयंत्र होते, असेही सामंत म्हणाले.

रामटेक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी सामंत नागपूरला आले असता त्यांनी पत्रकारांसोबत बातचित केली. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्रित लढली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन विचारांशी गद्दारी केली. (Latest Marathi News)

खरे गद्दार तेच आहेत. आदित्य ठाकरे यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आमच्या संपर्कात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणतात. याकडे लक्ष वेधले असता सामंत यांनी त्यांचेच आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

रश्मी बर्वेंचा काँग्रेसने अपमान केला, उदय सामंत यांचा आरोप
NCP Dispute: "अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करा", सुप्रीम कोर्टाचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निर्देश!

रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेचीच आहे. नारायण राणे मोठे नेते आहेत. त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत आपण काही बोलणार नाही. मात्र येथे शिवसेनेचाच उमेदवार राहील. अर्थात कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार कृपाल तुमाने, किरण पांडव, बाबा गुजर, डॉ. राजू पोतदार, सतीश शिंदे, जयदीप कवाडे आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

रश्मी बर्वेंचा काँग्रेसने अपमान केला, उदय सामंत यांचा आरोप
Summer Hydrating Drink : उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी प्या काकडी-पुदिन्याचे हायड्रेटिंग ड्रिंक, वाचा सोपी रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com