नातेवाईकांनाच साडेतीन कोटींनी चुना | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Double cost of money

नागपूर : नातेवाईकांनाच साडेतीन कोटींनी चुना

नागपूर : पंतप्रधान स्मार्ट सीटी एल.ई.डी.च्या नावाने ‘माय डायल डिजिटल एल.ई.डी. अॅन्ड मीडीया प्रा.लि.’ अशी बनावट कंपनी स्थापन करीत त्यात नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीतून दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष देत या सर्वांना सुमारे साडेतीन कोटींचा चुना लावल्याचे प्रकार उघडकीस आला आहे.

आकाश हरिदास सरोदे (दयानंद मैदान, वैशालीनगर,) आणि ‍अविजीत गोपाल डेब (रा.परगाना खरदाह, पश्‍चिम बंगाल ) अशी आरोपीची नावे आहेत. त्यांनी ‘कंपनी माय डायल डिजिटल एल.ई.डी. अॅण्ड मीडिया प्रा.लि. अशी कंपनी स्थापन केली. याशिवाय त्याला प्रधानमंत्री स्मार्ट सीटी एल.ई.डी. प्रत्येक शहरात होर्डींगव्दारे डिजिटल जाहिरात प्रसारण करण्याकरिता आणि एल.ई.डी. लावण्याचे कंत्राट मिळाल्याची बतावणी केली. याशिवाय त्यात गुंतवणूक केल्यास दरमहा २० टक्के पैसे मिळणार असल्याचे आमिष दाखविले.

हेही वाचा: नाशिक : जिल्‍ह्यात ५७ पॉझिटिव्‍ह ६० कोरोनामुक्‍त; एक मृत्‍यू

त्यामुळे बऱ्याच नातेवाइकांनी आणि ओळखीच्या व्यक्तींनी सुमारे त्यात गुंतवणूक केली. मात्र, काहीच दिवसात गुंतवलेल्या पैशावर परतावा मिळत नसल्याची बाब समोर आल्याने नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींनी विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, आकाश आणि अविजीत दोघांनीही त्यांना टाळाटाळ केली. यानंतर ते फरार झाले. याबाबत उत्तराखंड येथील पार्वती सुरजमनी चमोली (वय २८ वर्ष, रा. शाहनगर, पोस्ट ऑफीस

डिफेंस कॉलनी, डेहराडुन) यांनी केलेल्या तक्रारीचा आधार घेत, नागपूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान यात देशभरातील अनेकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सध्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा विभाग करीत आहे. सुमारे ३ कोटी ५७ लाख ४८ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

loading image
go to top