RTE Admission: आरटीईच्या १० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; प्रवेश मिळवण्यासाठी सादर करण्यात आलं होतं बोगस प्रमाणपत्र

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक पालकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून प्रवेश घेतल्याची बाब उघड झाली असून १० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले.
Nagpur News
Nagpur News Esakal

Fake Certificate for RTE Admission: आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक पालकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून प्रवेश घेतल्याची बाब उघड झाली असून १० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले.

याविषयी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोन एप्रिलपर्यंत अहवाल मागविण्यात आले होते. शहर गटसाधन केंद्र दोनमध्ये दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश बोगस आढळले असून ते तडकाफडकी रद्द केल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेच्या पाठपुराव्यानंतर आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशाची विशेष मोहीम सुरू केली. तेराही तालुक्यांतील बीईओंना अशा प्रवेशित विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

दोन एप्रिलपर्यंत हे अहवाल सादर करावेत, अशा सूचना होत्या. त्यातील शहर गटसाधन केंद्र दोन आणि पारशिवनी तालुक्याचा अहवाल सादर झाला आहे. शहर गटसाधन केंद्रात तब्बल १० विद्यार्थी बोगस प्रवेशित आढळले आहे. बोगस दस्तऐवज सादर करून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शहर आणि शहरालगतच्या तालुक्यांत अधिक असावी, असा अंदाज शिक्षण विभागाचा आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. पारशिवनी तालुक्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो निरंक आहे. (Latest Marathi News)

भाडेकरारपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न खोटे!

अनेक पालकांनी मोठ्या इंग्रजी शाळांत प्रवेश मिळावा म्हणून बोगस भाडेकरारपत्र, जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखले बोगस लावल्याचे सांगण्यात येते. आरटीई प्रवेशावेळी शिक्षण विभागाची पडताळणी होत असताना ते समोर आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur News
Election 2024: प्रत्येक महिलेला हवा सन्मान आणि सुरक्षितता; महिला मतदारांच्या राजकीय सक्षमीकरण सर्व्हेक्षणात नेमक काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com