
School Fee Issue: प्राथमिक शिक्षण घेणंही आपल्याकडं आता अत्यंत अवघड बाब बनली आहे. याचीच प्रचिती नुकतीच नागपुरात आली आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी भरलेली नसल्यानं शाळेच्या मुख्याध्यापकानं थेट पालकांच्या व्हॉट्सअॅपवर विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकल्याचा दाखलाच पाठवून दिला. या प्रकारामुळं खळबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षण हे कायद्यानं सक्तीचं केलेलं असताना शाळेतून विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा शाळांचा हा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.