Nagpur School Horror
esakal
नागपूर : शाळा हे शिक्षणाचे मंदिर मानले जाते, मात्र नागपुरात याच मंदिराला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १०९८ चाईल्ड हेल्पलाईनच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.