Nagpur: ऑनलाइन, ऑफलाइन वर्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

नागपूर : ऑनलाइन, ऑफलाइन वर्ग सुरू

नागपूर : दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर बुधवारी राज्यासह नागपूर जिल्ह्यातील सुट्या संपल्या. त्यामुळे आज गुरूवारपासून शाळा सुरू झाल्या. यासोबतच राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसह महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत. ग्रामीण भागात ५ ते १२ तर शहरात ८ वी ते १२ च्या शाळा सुरू झाल्यात. याशिवाय पहिली ते चौथीच्या ऑनलाइन वर्गासही सुरूवात करण्यात आली.

कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दिवाळीनंतर शाळेचा पहिला दिवशी मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्यामुळे शाळेचा परिसर चांगलच फुलला होता. दिवाळीनंतर कमी सुट्या मिळाल्या तरी विद्यार्थी खुश दिसून येत होते. दुसरीकडे दोन डोज अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी न घेतल्याने महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती दिसून आली नाही. त्यामुळे शाळा गजबजल्या असल्या तरी महाविद्यालयांमध्ये परिसराबाहेरच अद्यापही विद्यार्थी दिसून येत आहेत. याशिवाय पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्याच्या शाळा सुरू न झाल्याने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसवर समाधान मानावे लागले.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

पालकांची दमछाक कायम

शाळा सुरू झाल्या असल्या तरी स्कुल बस आणि व्हॅनला अद्याप परवानगी मिळाली नसल्याने आजची सकाळ पालकांसाठी बरीच घाईगर्दीची गेली. नोकरदार पालकांना आपली कामे सांभाळत पाल्यांना शाळेत पोहचवून द्यावे लागले. त्यामुळे पालकांची मोठी दमछाक झाली.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर

कोरोनामुळे शाळा उशीरा सुरू झाल्याने शाळांनी अद्याप प्रथम सत्रांत परीक्षा घेतली नाही. प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असून नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे ऑनलाइन अभ्यास सुरू असला तरी शिक्षकांचा भर शाळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असल्याचे मत व्यक्त केले.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

परीक्षेबाबतच्या सूचनांची प्रतीक्षा

महाविद्यालये देखील ऑफलाईन व ऑनलाईन सुरू झाली आहे. महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोज पूर्ण झाले आहेत. अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तथापि, लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दुसरीकडे विद्यापीठाच्या सेमिस्टर परीक्षा सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये घेतल्या जातात. कोरोनामुळे त्या अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत.

loading image
go to top