
नागपूरमध्ये एका शाळेत आठवी आणि नववीच्या मुलींचे अर्धनग्न फोटो शैक्षणिक कामासाठी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाल परिसरातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या पालकांना शाळेतले शिक्षणाधिकारी असल्याचं सांगत व्हॉटसअपवर मेसेज केले गेले. यात सुरुवातीला शैक्षणिक कामासाठी फोटो मागवले आणि नंतर अर्धनग्न फोटो मागवण्यात आले.