

Nagpur News: स्वच्छ शहरासाठी महापालिका व नागपूर स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक ठिकाणी ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन लावले. परंतु नागपूरकरांनी त्याचा वापर करणेही टाळले तर काही असामाजिक तत्वांकडून त्यांची तोडफोडही करण्यात आले. त्यामुळे जवळपास चार कोटींचा ‘कचरा’ झाल्याचे चित्र आहे.
स्वच्छ शहरासाठी महापालिकेकडून विविध उपक्रमासोबतच प्रकल्पही राबविण्यात येत आहे. परंतु नागपूरकरांची साथ लाभत नसल्याने महापालिकेला तोकड्या मनुष्यबळावर एकाकी झुंज द्यावी लागत आहे. महापालिकेने या वर्षांच्या सुरुवातीला ओला व सुका कचरा गाळा करण्यासाठी २ हजार ४०० डस्टबिन खरेदी केल्या होत्या.
एका डस्टबिनची किंमत १८ हजार ४५० रुपये असून महापालिकेने २ कोटी २१ लाख रुपये यासाठी खर्च केले. एवढेच नव्हे नागपूर स्मार्ट सिटी कंपनीनेही २ कोटी रुपये खर्च करून २०० डस्टबिन खरेदी केल्या होत्या, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुत्राने नमुद केले.
सद्यस्थितीत या डस्टबिनचा दुरवस्था बघता नागपूरकरांनी महापालिकेचे स्वच्छ शहराचे प्रयत्न हाणून पाडल्याचे चित्र आहे. नागपूरकरांनी या डस्टबिनचा विवेकपूर्ण वापर न केल्याने असामाजिक तत्त्वांनी लक्ष्य केले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या डस्टबिन चोरीला गेल्या किंवा चोरण्याच्या नादात त्या तोडफोड करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
सिव्हिल लाइन्स येथील रविंद्रनाथ टागोर मार्गावरील डस्टबिनची दुरवस्था झाली. वेस्ट हायकोर्ट रोड, इस्ट हायकोर्ट रोड, सक्करदरा, खामला, कळमना रिंग रोडवरील डस्टबिनचीही वाताहत झाली आहे. काही भागात नागरिकांनी याचा वापर केला. परंतु चोरट्यांनी डस्टबिन पळविल्याने आता नागरिक त्याच ठिकाणी कचरा फेकत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांपुढे नवे आव्हान उभे झाले आहे. या डस्टबिनची रचनाच चुकीची असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या लीना बुधे यांनी सांगितले. कचऱ्याने भरलेल्या डस्टबिन सफाई कर्मचाऱ्यांसाठी ते उचलणे कठीण असल्याचे त्या म्हणाल्या.(Latest Marathi News)
डस्टबिनभोवती बनले डम्पिंग यार्ड
शहरातील रस्त्यावरील विक्रेत्यांनी या डस्टबिनचा वापर केला आणि करीत आहेत. परंतु सुका व ओल्या कचऱ्याच्या डस्टबिनमधून कचरा बाहेर पडलेला दिसून येते. अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांकडून हा कचरा उचलला जात नाही. परिणामी डस्टबिनजवळ मिनी डम्पिंग यार्ड तयार झाल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.