MD
MD sakal

Nagpur : उत्तरप्रदेशातून नागपूरमध्ये MD ची तस्करी ; विक्रेत्यास उत्तरप्रदेशातून अटक

शहरातील हॉटेल प्राईडसमोर अंमली पदार्थविरोधी पथकाद्वारे जप्त

नागपूर : शहरातील हॉटेल प्राईडसमोर अंमली पदार्थविरोधी पथकाद्वारे जप्त केलेल्या दोन कोटी रुपयांची एमडी विक्रेता संदीप इंद्रजित तिवारी (वय ४३) यास अंमली पदार्थविरोधी पथकाने उत्तरप्रदेशातील जौनपूर येथून अटक केली. आता आरोपींची संख्या सातवर गेली असून अनेक जण पोलिसांच्या रडारवर आहेत.

होळी आणि धुलीवंदनासाठी वर्ध्यातील पुलगाव येथून ‘एमडी’ ची मोठी खेप नागपुरात आल्यावर कुणाल गभणे आणि गौरव कालेश्‍वरराव या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यानंतर नंदू कुंभलकर आणि अक्षय येवले यांना अटक झाली.

त्यांनतर दोघांना अटक केल्यावर मुख्य सूत्रधार पंकज चरडे हा फरार होता. पंकज यानेच चौघांना एमडी पुरविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक मुंबईत गेले. मात्र, दोघाही गोव्यात होता. पंकज आणि अक्रम चुन्नू खड्डे यास गोव्यातून मुंबईतून अटक करून नागपुरात आणले.

उत्तरप्रदेशातून नागपूरमध्ये एमडीची तस्करी

तपासादरम्यान अक्रमच्या माध्यमातून मुंबईसह नागपुरात एमडी विक्रीचे जाळे निर्माण करण्यासाठी स्वतः एमडी तयार करणारा संदीप तिवारी यानेच ती एमडी दिल्याची माहिती पथकाला मिळाली. शुक्रवारी पथकाने त्याला शिताफीने अटक केली. दरम्यान तो स्वतःच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात एमडी तयार करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

कमी पैशात विकायचा एमडी

संदीप तिवारी हा मुळात केमेस्ट्रीचा विद्यार्थी असल्याने त्याने काही काळ फार्मसीमध्येही काम केले होते. त्यामुळे औषधांचे ज्ञान त्याला असल्याने त्याने घरातच एमडी तयार करण्याचे काम सुरू केले. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात एमडी तयार करून तो विकायचा.

मुंबईत त्याची भेट अक्रम खड्डे याच्याशी झाली. त्याने त्याला कमी किमतीत एमडी करून देण्याचे मान्य केले. त्यातून प्रथम संदीपने त्याला २०० ग्रॅम एमडी फुकट दिले होते. दरम्यान त्यानंतर २ कोटी रुपयांची एमडीची खेप दिली.

एक हजार कोटीच्या ड्रग्ज तस्करीतही अटक

उत्तरप्रदेशातील संदीप तिवारी याला मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये १ हजार कोटीच्या ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यातून जामिनावर सुटका केली होती. त्याच्याकडून एमडी घेण्यासाठी पंकज आणि अक्रम स्वतः वाराणसीला गेले.

त्यानंतर मुंबईला परतले. यानंतर पंकजने आपल्या कारमधून ड्रग्ज घेतले आणि नागपूरला निघून गेला. पुलगाव येथे त्याने कुणाल आणि गौरवला माल दिला होता. सर्व आरोपींचे जुने गुन्हे नोंद आहेत. पंकजवर खुनासह १४ गुन्हे दाखल आहेत. अक्षयवर हत्येसह १३ गुन्हे दाखल आहेत. कुणालवर खुनाचाही आरोप आहे. संदीपवर मुंबईत अमलीपदार्थ तस्करासह ४ गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com