Nagpur : दुपारी पदोन्नती, सायंकाळी निवृत्ती

सामाजिक न्याय विभागाचा प्रताप : १० वर्षांनंतर पदोन्नतीचा लाभ
promotion
promotion

नागपूर : सामाजिक न्याय नाव असलेल्या विभागाकडून अधिकाऱ्यांना न्यायासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एका अधिकाऱ्याला दुपारी पदोन्नती दिल्यानंतर सायंकाळी निवृत्त व्हावे लागले. म्हणजेच निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्याला पदोन्नती देण्याचा अजब प्रताप या विभागाने केला. विशेष म्हणजे पदोन्नतीची चार पदे रिक्त असताना फक्त निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा लाभ देत खानापूर्ती केल्याचे दिसते. मात्र या प्रकाराने पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला.

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. या विभागाची धुरा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीची जबाबदारीही आहे. राज्यस्तरावर या विभागात सह आयुक्तांची चार पदे आहे. ही सर्व पदे पदोन्नतीच्या माध्यमातून भरतात. सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त, त्यानंतर उपायुक्त व त्यानंतर सहआयुक्त पदावर पदोन्नती देण्यात येते. सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांना पदोन्नतीचा लाभच मिळाला नाही. गेल्या चार वर्षापासून एकाही अधिकाऱ्याला सहआयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली नाही.

पद रिक्त असूनही पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून विभागात नाराजीचा सूर आहे. या काळात दोन मुख्यमंत्री व दोन मंत्री होऊन गेले. तर तिसरे मुख्यमंत्री व मंत्री विराजमान झाले. यापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनही केले. अधिकारी पात्र असतानाही त्यांना पदोन्नती मिळाली नाही. विशेष म्हणजे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत काही जण निवृत्त झाले तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

दुपारी पदोन्नती, सायंकाळी निवृत्ती

त्यामुळे सामाजिक न्यायाची जबाबदारी असलेला विभागच न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर मंत्रालयस्तरावर हालचाल झाली. उपायुक्त आर.डी. आत्राम यांना सहआयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. दहा वर्षानंतर त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला. निवृत्त होण्याच्या दिवशी त्यांची पदोन्नतीची फाइल ‘ओके’ करण्यात आली. दुपारी पदोन्नती मिळाल्यानंतर सायंकाळी ते निवृत्त झाले. विभागाच्या या प्रकाराने सर्वानाच धक्का बसला आहे.

रिक्त पद कायम

सामाजिक न्याय विभागात सहआयुक्त पदांची चार पदे आहेत. ती पदोन्नतीतून भरण्यात येतात. अधिकारी पात्र असतानाही कुणालाही पदोन्नती देण्यात आली नाही. आत्राम यांना पदोन्नती मिळताच ते निवृत्त झाले. त्यामुळे सहआयुक्तांची चारही पदे रिक्तच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com