Nagpur: मुलगा व सून करतात अतोनात छळ; मुलासाठी हालअपेष्टा सोसल्या पण तो घराबाहेर काढण्याची धमकी...

पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून मुलासह त्याचा पत्नीविरोधात ज्येष्ठ नागरिक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
old age death
old age deathsakal

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आयुष्यात हालअपेष्टा सहन करीत मुलाला वाढविले. स्वतःच्या पायावर उभे केले. प्रसंगी रक्ताच पाणी केलं. मात्र आज मुलगा आयुष्याच्या संध्याकाळी आमची काळजी घ्यायला तयार नाही. आजारपणात आमचा सांभाळ करायला तयार नाही.

आम्हाला घरातून काढून टाकण्याची धमकी देतो, अशी तक्रारच एका पित्याने आपल्या मुलासह सुनेविरोधात पोलिसांकडे दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून मुलासह त्याचा पत्नीविरोधात ज्येष्ठ नागरिक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

old age death
Pune News : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 11 कोटीचे अनुदान मंजूर

गिट्टीखदान परिसरातील हजारी पहाड येथील आशा बालवाडी जवळ मजूर दाम्पत्य राहतात. त्यांचा मुलगा हा सुरक्षारक्षकाचे काम करतो. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. वाढत्या वयामुळे काम होत नसल्याने आपल्या जबाबदारीतून मुक्त होत पित्याने काम सोडले. त्यामुळे वृद्ध पती आणि त्यांची पत्नी दोघेही घरी असतात.

यादरम्यान कधी ते आणि त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यास त्यांना औषधीसाठी मुलगा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे, त्यांना वेळेवर जेवण न देणे, कधी त्यांच्यासाठी काहीही न करणे, दुर्लक्ष करणे अशी वागणूक मुलगा आणि सून देऊ लागले.

अनेकदा ही बाब मुलाला सांगितल्यास तोही पत्नीची बाजू घेत, त्यांच्याशी भांडायचा. प्रसंगी मारहाणही करायचा. स्वतःचे घर असताना, परक्यासारखी वागणूक देत, आई-वडिलांना घरातून काढून टाकण्याची धमकी द्यायचा.

old age death
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था! पाहणीसाठी आलेले भाजपचे मंत्रीच अडकले वाहतूककोंडीत

त्यामुळे त्रस्त पित्याने गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठले. त्यांची हकीकत ऐकूण पोलिसही गहिवरले. यानंतर लक्ष्मण खंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी २३ कलम २४ ज्येष्ठ नागरिक कायदा सन २००७ सुधारित २०१५ नुसार मुलगा आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

आई-वडील ही मुलांची जबाबदारी आहे. त्यापासून त्यांना दूर जाता येणार नाही. कायद्यात असलेल्या कलमांनुसारच हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातून प्रत्येक मुलाला आपल्या जबाबदारीची जाणिव व्हावी हीच आमची अपेक्षा आहे.

महेश सागडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गिट्टीखदान पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com