Nagpur : काटोल-नरखेडला एक्सप्रेसचा नियमित थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

express railway

Nagpur : काटोल-नरखेडला एक्सप्रेसचा नियमित थांबा

नरखेड : शुक्रवारपासून(ता.१४) ‘गोंडवाना एक्सप्रेस’ला काटोल-नरखेड येथे नियमित थांबा मिळाला असून याच गाडीने चरणसिंग ठाकूर, किशोर रेवतकर यांनी दिल्ली-काटोल असा प्रवास केला. शुक्रवारी सकाळी ७ वाजता काटोल रेल्वे स्थानकावर प्रवासी मंडळ, भाजपा पदाधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: Nagpur : राजकीय ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगणार

याप्रसंगी भाजपा अध्यक्ष काटोल विजय महाजन, सोपान हजारे, संदीप भुतडा, मोहन सावल, भरत पटेल, विजय केला, गौरिश डांगरा, सुधीर रेंगे, रामभाऊ राऊत, प्रमोद निर्वाण, खुशाल धवराळ, अशोक काळे, गजानन भोयर, हेमंत कावडकर, डॉ सोनेकर, संजय शिंदे, प्रा.रमेश येवले, प्रकाश देशभ्रतार, भूषण भोयर, चंद्रकांत चौधरी, गणपत चालखोर, महिला आघाडीच्या विद्याताई कावळे, सुनिताताई काळे, प्रतिमा देशभ्रतार, युवा मोर्चाचे निखील आरोडे, शुभम परमाल, चैतन्य भजन, उल्हास आगे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: Nagpur : पंधराशे विद्यार्थ्यांसाठी एकच संस्था

कोरोना काळापूर्वी काटोल-नरखेड रेल्वे स्टेशनवर सुरु असलेले एक्स्प्रेस गाड्यांचे रेल्वे थांबे कोरोना काळात सर्व बंद करण्यात आले होते. हे थांबे पूर्ववत करण्यासाठी काटोल विधानसभा क्षेत्राचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या मदतीने सुरुवातीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनीही रेल्वे थांब्याच्या निवेदनावर आश्वस्त केले होते.

हेही वाचा: Nagpur : कोळशाची आयात २०२५ पर्यंत थांबविणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

दरम्यानच्या काळात ४ ऑक्टोबरपासून नरखेड शहर भाजपच्या वतीने लोकभावनेचा आदर करून रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी भाजपचे नगर विकास आघाडी जिल्हा महांमत्री मनोज कोरडे यांच्या नेतृत्वात शामराव बारई, संजय कांमडे व इतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह साखळी उपोषणाचे अस्त्र उगारले.

हेही वाचा: Nagpur : शुद्ध पाण्यासाठी ‘आप’चे निवेदन

या साखळी उपोषण आंदोलनाला भाजप नेते चरणसिंग ठाकूर, जिल्हा संघटनमंत्री किशोर रेवतकर, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष संदीप सरोदे यांनी भेट दिली. तीव्र जनभावना लक्षात घेऊन आंदोलनातील नेत्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाण्याचे निश्चित झाले. शिष्टमंडळात भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात उकेश चव्हाण, शामरावजी बरई, संजय कांमडे, मनिश दुर्गे, सुरेश शेंद्रे, रूपेश बारई यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली व जनभावना लक्षात आणून रेल्वे थांब्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाला निर्देश दिले आणि अखेर गोंडवाना एक्सप्रेस शुक्रवारपासून नरखेड-काटोल रेल्वे स्थानकावर थांबली.