

Pachmarhi Tourist Tragedy Nagpur Teacher Falls Into 150 Feet Gorge After Monkey Tries to Snatch His Bag
esakal
नागपूर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पचमढी येथे सहलीसाठी गेलेल्या नागपूरच्या शिक्षकाचा १५० फूट खोल प्रियदर्शिनी व्ह्यू पॉइंटवरील दरीत कोसळून मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ६) सकाळी पावणे सातच्या सुमारास प्रियदर्शिनी व्ह्यू पॉइंट येथे ही दुर्घटना घडली. फोटो काढत असताना माकडाने त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला.