

Nagpur Temple Theft Video viral
esakal
Thief Apologizes Before Robbery : मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी चक्क देवासमोर कान पकडून माफी मागितली. देवाची माफी मागून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले आणि रोकड घेऊन पोबारा केला. मात्र, चोरी केल्यानंतर दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यातील एक आरोपी चोरीनंतर छत्तीसगडला पळून जात असताना रस्ते अपघातात जखमी झाला, तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.