esakal | Nagpur: सिकंदराबाद एक्सप्रेसच्या धडकेने युवक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident-train

नागपूर : सिकंदराबाद एक्सप्रेसच्या धडकेने युवक ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि. नागपूर) : रमानगर रेल्वे फाटक ओलांडणाऱ्या तरुणाला सिकंदराबादवरून रायपूरला जाणाऱ्या एक्सप्रेसने धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज गुरूवारी (ता.१४) सकाळी साडेनऊ वाजता घडली. यशवंत रामेश्वर समुद्रे(वय१७, सुदर्शन भवन जवळ गवळीपुरा कामठी) असे मृताचे नाव आहे.

कामठी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत रामेश्वर समुद्रे हा सकाळी साडेनऊ वाजता सुमारास रमानगर रेल्वे फाटक ओलांडून रवीदास नगरकडे जात होता. त्याच दरम्यान नागपूरवरून कामठी स्टेशनमार्गे ट्रेन क्रमांक २७१८ सिकंदरा रायपूर एक्सप्रेसने जबर धडक दिल्याने यशवंत समुद्रे जागीच ठार झाल्याची घटना घडली.

हेही वाचा: मी लोळत जाईन, नाही तर गडगडत : उदयनराजे

घटनेची माहिती कामठी रेल्वे पोलिस चौकीला मिळाली असता हेड कॉन्स्टेबल भगवान जयस्वाल, आशीष गोडबोले, अनिल यादव घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. कामठी रेल्वे पोलिस चौकीला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भगवान जयस्वाल करीत आहेत.

...तर प्राण वाचले असते

रमानगर रेल्वे फाटकावर ब्रिजचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे फाटकावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रेल्वे फाटक बंद नसल्यामुळे आज यशवंत रेल्वे फाटक ओलांडून रवीदास नगरकडे जात असताना अपघात होऊन मरण पावला. कंत्राटदाराने रेल्वे फाटक नेहमीकरिता बंद केले असते तर आज ही घटना घडली नसती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. यशवंत हा आईवडिलांना एकुलता एक असल्याने रमानगर गवळीपूरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top