
नागपूर : मराठी सिनेसृष्टी मधील वंदना गुप्ते-भारती आचरेकर, मृण्मयी-गौतमी देशपांडे, पौर्णिमा भावे-पल्लवी वैद्य या काही बहिणींच्या जोडी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. यात आणखी एका जोडीची भर पडली. नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या दोघी मूळच्या नागपूरच्या आहेत. स्नेहा काटे-शेलार (स्नेहा अशोक मंगल) आणि काजल काटे-कदम अशी या अभिनेत्री बहिणींची नावे आहेत.
स्नेहा आणि काजलचा जन्म सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अशोक काटे पोलिस खात्यात पोलिस निरीक्षकपदी होते. आई मंगला काटे यांच्या पाठिंब्याने स्नेहा व काजलच्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीची सुरवात नागपूर शहरातूनच झाली. संदीप डाबेराव यांच्या रंगरसिया थिएटर ग्रुपमधून त्यांनी सर्वप्रथम अभिनयाचे धडे गिरवले. इयत्ता तिसरीत असताना सावित्रीबाई फुले यांचे पात्र साकारून बालवयातच स्नेहाने रंगभूमीवर पदार्पण केले. स्नेहा सध्या ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या हिंदी मालिकेमध्ये जिजाबाईंची भूमिका उत्तमरीत्या साकारते आहे. याव्यतिरिक्त स्वराज्यजननी जिजामाता, प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, गर्ल्स हॉस्टेल, दुनियादारी फिल्मी इश्टाईल अशा अनेक मालिका, नाटकांमधून तिने अभिनय केला. सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतील दौलत म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलार हा स्नेहाचा नवरा.
तर, लहान बहीण काजल काटे-कदम माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या दहा वर्षांची असताना तिने ‘आफताब’ नाटकापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. पुढे ‘सकाळ करंडक, पुरुषोत्तम करंडक, महापौर करंडक’ अशा विविध नाट्य स्पर्धेत सहभागी होत ती नाटकाशी जुळून राहिली. ‘तुझं माझं ब्रेकअप, स्वराज्यजननी जिजामाता, डॉक्टर डॉन, विठूमाउली, प्रेमा तुझा रंग कसा’ अशा अनेक मालिकांत दिसली. काजल २०१९ साली मुंबई इंडियन्स संघाचा फिटनेस प्रशिक्षक प्रतीक कदमसोबत विवाहबद्ध झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.