Nagpur : कर्नाटकातील दोन हत्ती पेंचमध्ये दाखल

दोन माहूतही आलेत : मानव - वन्यजीव संघर्ष, वाघाचा घेणार मागोवा
Nagpur news
Nagpur newsesakal
Updated on

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात कर्नाटकातील दोन हत्ती दाखल झाले आहेत. सध्या दोन्ही हत्ती सलग चार दिवसाचा प्रवास करून आल्यामुळे त्यांना चोरबाहूली वन परिक्षेत्राच्या कार्यालय परिसरात देखरेखीमध्ये ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही हत्ती डुब्बारे येथून आणले आहेत. लवकरच पुन्हा दोन हत्तींना आणण्यात येणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू केलेली आहे.

Nagpur news
Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

राज्याचे प्रधान मुख्य मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ऑगस्ट महिन्यात चार हत्ती आणण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयार करण्यात आली. हत्तीची निवड करून दोन हत्ती आणले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याच्या चोरबाहुली वन परिक्षेत्रामध्ये हत्तींचा कॅम्प स्थापन केला आहे. नवेगाव खैरी धरणातील जलाशयाच्या काठावरील बोरबन येथे हत्ती कॅम्प आहे.

Nagpur news
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

या हत्तीकॅम्पचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त परिसरात विस्तारलेले आहे. बचाव कार्य, वाघांचा मागोवा घेणे आणि गस्त घालण्यासाठी हत्तींना प्रशिक्षण देणे आणि त्यांचा वापर करणे हा या हत्तीकॅम्पचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय हा परिसर सफारी मार्गावर असल्याने हत्तींचा वापर पर्यावरणीय पर्यटनासाठी देखील केला जाईल.

Nagpur news
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

हत्ती सोबत दोन माहूत आणि दोन चारा कापणारे असे चार कर्मचारी आलेले आहे. सध्या या हत्तीना चोरबाहूली वन परिक्षेत्रात ठेवण्यात आलेले आहे. चार दिवसाचा प्रवास करून आल्याने हत्ती पुढील दोन ते तीन दिवस येथेच विश्रांती करणार आहेत. त्यानंतर त्यांना हत्ती कॅम्पवर नेण्यात येणार आहे. माहूतांकडून स्थानिक कर्मचाऱ्यांनाही हत्तीला हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Nagpur news
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

भीमा आणि सुब्रमण्यम पोहोचले

रंजन (वय २५ वर्षे) आणि सुब्रमण्यम (वय २५) या दोघांना मेडिकेर विभागाचे दुबरे कॅम्प आणि भीमा (वय ५३) याला माटीगोडू कॅम्प, नागरहोल व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात येणार आहे. या निवडलेल्या नर हत्तींना प्रशिक्षण दिले गेलेले आहे. मादी हत्तीची ओळख पटविण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या तीन हत्तींपैकी भीमा आणि सुब्रमण्यम या हत्तींना पेंच येथे आणले आहे.

त्यांचे स्वागत आमदार ॲड. आशिष जयस्वाल, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. यावेळी जयस्वाल यांनी हत्ती कॅम्पमुळे पेंचच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे सांगून पर्यावरण पर्यटनाशी संबंधित इतर उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com