esakal | नागपूर : दोन बहिणींनी काढला प्रियकरांसोबत पळ
sakal

बोलून बातमी शोधा

 Minor lovers

नागपूर : दोन बहिणींनी काढला प्रियकरांसोबत पळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जयताळा चौकात राहणाऱ्या १४ आणि १६ वर्षीय दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना वस्तीतीलच दोन मुलांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. पळवून नेणारे मुलेही अल्पवयीन असल्याचे समजते. शारीरिक आकर्षण आणि प्रेम याच्यातील अंतर समजून न घेता दोन्ही बहिणींनी प्रियकरासोबत पळ काढला. अशा प्रकरणांमुळे पालकवर्गांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दोघ्याही बहिणी साखर आणण्यासाठी दुकानात जातो, असे सांगून त्या घरून निघाल्या. तासभर झाला तरी दोघ्याही बहिणी घरी न आल्याने त्यांनी त्यांचा शोध घेतला. इकडे तिकडे शोध घेऊनही त्या कुठेच मिळून आल्या नाही. मुलींचा शोध सुरू असतानाच त्याच वस्तीतील दोन मुले आपल्या घरून बेपत्ता असल्याचे समजले. त्यावरून त्या मुलांनी दोघ्याही बहिणींना पळवून नेल्याचे लक्षात आले. लगेच मुलीच्या वडिलाने प्रतापनगर पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार केली. प्रतापनगर पोलिसांनी देखील चौघांचाही अनेक ठिकाणी शोध घेतला असता ते मिळून आले नाही.

हेही वाचा: Nagpur : मोकळ्या भूखंडधारकांवर अजूनही कारवाई नाहीच

चौघाहीजवळ मोबाईल नसल्याने त्यांचा शोध घेण्यास अडचण असल्याचे प्रतापनगर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दोघ्याही बहिणी नववी आणि अकरावीत शिकतात. त्यांचे वस्तीतील दोन मुलांशी सूत जुळले. एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले की, त्यांनी थेट पळून जाण्याचा टोकाचा निर्णय घेतला. चौघांनी मिळून पळून जाण्याचे नियोजन करून रविवारी पलायने केले. पळून गेल्यानंतर ते भविष्यात कुठे जाणार?, कसे जगणार? आदी प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

loading image
go to top