नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या, कोरोनामुळे निर्णय

online exam 1
online exam 1e sakal

नागपूर : कोरोनाने आजारी असताना एका विद्यार्थिनीने अतिदक्षता वार्डातून परीक्षा दिल्याचे 'सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTM nagpur university) ५ ते २० मे दरम्यान जाहीर केलेल्या ऑनलाइन परीक्षा (online exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. (nagpur university exam postponed due to corona)

online exam 1
विद्यापीठाकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत, अर्जासाठी नेमक्या कोणत्या कागदपत्रांची गरज?

रुग्णांची संख्या वाढत असतानाही विद्यापीठाने परीक्षा घेण्याचा अट्टाहास धरला होता. महाविद्यालयीने स्तरावर सुरुवात देखील केली होती. नापास होऊ या भीतीने एका विद्यार्थिनीने नाइलाजाने अतिदक्षता वॉर्डातून परीक्षा दिला. या वृत्ताने विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता. त्याचे पडसाद उमटताच गुरुवारी विद्यापीठाने एका महिन्यासाठी अंतिम वर्ष वगळता विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावरीत सर्व परीक्षा रद्द करण्याचे आदेश काढले. याबाबत उद्या परिपत्रक काढण्यात येणार आहे.

भयावह परिस्थितीमध्ये परीक्षा घेऊ नये, किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जासाठी आग्रह करू नये अशी मागणी प्राचार्य संघटनांकडून करण्यात सातत्याने केली जात होती. ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असल्याने अडचण नाही असा विद्यापीठाचा दावा होता. कोरोनाग्रस्त असलेल्या विद्यार्थी परीक्षा कशी देणार यावर विद्यापीठाने मौन बाळगले होते. सर्वत्र नकार मिळत असतानाही विद्यापीठाने परीक्षा घेण्याचा अट्टाहास धरला होता. याविरोधात ‘द प्लॅटफॉर्म’ आणि मानव अधिकार संरक्षण मंचाच्यावतीने मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करीत तात्काळ परीक्षा रद्द करावी व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली.

online exam 1
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना? 'या' वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा

अर्ज भरण्याचीही मुदत वाढणार

विद्यापीठाद्वारे कोरोना काळात १५ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रथम वर्षांचा परीक्षा न होता कसे काय दुसऱ्या सेमिस्टरचे अर्ज भरायचे असा तिढा निर्माण झाला आहे. ही बाब ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर.जी.भोयर यांनी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता परीक्षा अर्ज करण्याचा तारखेतही वाढ होणार आहे.

कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता, परीक्षा घेणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे परीक्षा एका महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याविषयी उद्या परिपत्रक काढण्यात येणार आहे.
डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com