esakal | विद्यार्थ्यांनो! कुठल्याही शाखेत करा पीएच. डी. विद्यापीठ पुरविणार 'ही' सुविधा

बोलून बातमी शोधा

Phd students
विद्यार्थ्यांनो! कुठल्याही शाखेत करा पीएच. डी. विद्यापीठ पुरविणार 'ही' सुविधा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. करण्यास इच्छुक उमेदवारांना दोन मोठ्या भेट दिल्या आहेत. विद्यापीठाने स्वतःहून आंतरशाखा संशोधन सुविधा सुरू केली असून याअंतर्गत, विशिष्ट विद्याशाखेत शिक्षण घेतलेले उमेदवार आपल्या आवडीच्या इतर कोणत्याही शाखेत पीएच.डी. करू शकतील. या योजनेसाठी विद्यापीठाने आंतरविद्याशासकीय अभ्यास मंडळाची स्थापना केली आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले लाखनीचे युवक; ऑक्‍सिजन सिलिंडरची केली व्यवस्था

विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल त्याच शाखेत पीएच.डी. करावी लागते. आवडत्या विषयात पीएच.डी. करता येणे शक्य होत नाही. परंतु, विद्यार्थ्यांना आता त्यांच्या आवडत्या विषयात पीएच.डी. करण्याची मुभा मिळावी यासाठी विद्यापीठाने आंतरशाखीय पीएच.डी. करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विद्यापीठाने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार एखादा विषय आंतरशाखेच्या विषयाखाली येतो की नाही हे आधी संशोधन केंद्राची संशोधन सल्लागार समिती ठरवेल. पात्रता पूर्ण झाल्यावर हा प्रस्ताव आंतरविद्या शासकीय मंडळाकडे पाठविला जाईल. हे मंडळ या विषयातील जाणकार शिक्षकांच्या मदतीने या प्रस्तावावर निर्णय घेईल. बोर्डाच्या मंजुरीनंतर उमेदवारांना संशोधन प्रक्रियेसह पुढे जाणे शक्य होईल. इतकेच नाही तर आपल्या विषयावरील संशोधनासाठी नागपूर विद्यापीठात सुविधा नसल्यास आपण देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संशोधन पूर्ण करू शकता. उल्लेखनीय आहे की यावर्षीपासून नागपूर विद्यापीठाने आपल्या पीएच.डी. प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. विद्यापीठातील पीएच.डी. उमेदवारांची संख्या आणि पीएच.डी.ची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हे बदल केले गेले आहेत.

हेही वाचा: वॉर्डबॉयनेच चोरले रेमडेसिव्हीर इंजेक्शन, कारागृहात रवानगी

'पेट' लांबली तरीही -

कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाने मे महिन्यातील प्रस्तावित पीएच.डी. प्रवेश परीक्षा पुढे ढकलली असली तरी पीएच.डी.शी संबंधित इतर तयारीबाबतही काम सुरू आहे.

संशोधनाची गुणवत्ता वाढवून, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार कुठल्याही विषयात पीएच.डी. करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू