Nagpur : अभिनयाचा अग्निहोत्र तेवत ठेवणारे महेश रायपूरकर

ज्येष्ठ कलावंताचा ५५ वर्षांचा यशस्वी प्रवास
Mahesh Raipurkar
Mahesh Raipurkarsakal

नागपूर : कलेचे व्यावसायीकरण न करता केवळ हौसेपोटी कलेचा आनंद घेत जगणारे अनेक कलावंत हौशी रंगमंच क्षेत्रात पाहायला मिळतात. स्वत: पडत, धडपडत आयुष्य जगत असले तरी आपल्या सभोवताली कला आणि कलावंतांचा अग्निहोत्र सतत तेवत राहायला हवा, ही त्या मागची भावना असते.

शहरातील ज्येष्ठ अभिनेते महेश रायपूरकर याच पठडीतील कलावंत. नाटक, लघुपट, जाहिरात, चित्रपट, वेबसिरीज अशा एक ना अनेक व्यासपीठावरील अभिनयाच्या माध्यमातून ते शहराच्या सांस्कृतिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात.

कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना देखील शालेय जीवनापासून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन जीवनात भाऊसाहेब चांदेकर, मदन गडकरी, किशोर माटेगावकर यांच्याकडून प्रेरणा घेत महेश रायपूरकर यांनी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. बालनाट्य स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा यासह विविध महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धांमधून त्यांनी रंगमंचावर एंट्री घेतली. यातील काही नाटकांचे दिग्दर्शनसुद्धा केले.

आपली नोकरी अन्‌ सांसारिक जीवन सांभाळत त्यांनी अभिनयामध्ये आपली वाटचाल सुरू ठेवली. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात ग्रंथपाल म्हणून ते निवृत्त झाले. मुळ मिश्‍कील स्वभावाप्रमाणेच विनोदी भूमिकांमध्ये ते रमतात.

अभिनयाचा अग्निहोत्र तेवत ठेवणारे महेश रायपूरकर

सत्तरीच्या या वयात देखील अतिशय कठीण समजल्या जाणारा हा प्रकार तितक्याच ताकदीने मांडतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कंबल’, ‘पिलांटू’ या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. तर, वेलकम होम ही त्यांची वेबसीरीज नुकतीच प्रदर्शित झाली.

५५ वर्षांच्या त्यांच्या या प्रवासात आजवर त्यांनी १६ एकांकिका, १२ बालनाट्य, १४ लघुपट व जाहिराती, सहा महानाट्य, दोन चित्रपट आणि एका वेबसीरीजमध्ये काम केले आहे. भाजपाच्या ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या वादग्रस्त ठरलेल्या जाहिरातीमधून ते संपूर्ण राज्यामध्ये प्रकाशझोतात आले होते.

प्रत्येक कलावंताला मदत करीत, प्रत्येकाला सोबत घेत कलाकृतीच्या निर्मितीमध्ये हातभार लावणे, हा त्यांचा स्वभावच आहे. यातूनच शहरातील तब्बल १२ नाट्य व निर्मिती संस्थांसोबत त्यांचे संबंध जुळले, हे विशेष. त्यांच्या या अनोख्या कारकिर्दीसाठी त्यांना अ. भा. नाट्य परिषद व कामगार कल्याण मंडळातर्फे पुरस्कार देत गौरविण्यात आले आहे.

दोनदा कोमात, जिद्द मात्र कायम

महेश रायपूरकर वय वर्षे ७३. नाटकातील प्रत्येक संवाद खडान-खडा मुखपाठ असणाऱ्या या कलावंताला आज मात्र विस्मृती येते. त्याला कारणही तसेच. प्रकृती अस्वास्थामुळे आजवर दोनदा ते कोमात गेले होते.

मात्र, जिद्द अन्‌ अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी या वयातही काम करणे सोडले नाही. त्यांच्या अनेक प्रेक्षकांना त्यांची ही पार्श्वभूमी कदाचित माहिती नसावी. परंतु, स्वभावा प्रमाणेच त्यांनी ही परिस्थिती स्वीकारत या क्षेत्रात वाटचाल सुरू ठेवली आहे. आजच्या पिढीतील युवकांना त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असाच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com