Soybean MSP: हमीभावात सोयाबीन खरेदीची मुदत संपली नोव्हेंबरपासून सुरू होती खरेदी; मुदतवाढीसाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रह

बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा बरेच खाली गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात नाफेडकडून खरेदी सुरू असलेल्या खरेदीचा मुदत ता. ६ फेब्रुवारी रोजी संपली.
Soybean MSP News
Soybean MSP NewsSakal

Maharashtra Agriculture News Soybean Buying: बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा बरेच खाली गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात नाफेडकडून खरेदी सुरू असलेल्या खरेदीचा मुदत ता. ६ फेब्रुवारी रोजी संपली.
यावर्षी जिल्ह्यात पिकाची परिस्थिती चांगली नाही. सोयाबीनचा प्रतिक्विंटल भाव सुरुवातीला पाच हजाराच्या वर गेला होता.

भाव यापेक्षाही वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले. मात्र, गेल्या महिनाभरापासून सोयाबीनचे भाव चार हजारांपर्यंत खाली घसरले. सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल चार हजार सहाशे रुपये असताना यापेक्षाही कमी दराने बाजारात त्याची मागणी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. दरम्यान, नाफेड कडून हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश आले खरे; परंतु अकोला जिल्ह्यात प्रती हेक्टरी पाच क्विंटल ९० किलो एवढेच सोयाबीन खरेदी करण्याचे सांगण्यात आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे.

नाफेडकडून जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यात दहा केंद्र कार्यरत करण्यात आले होते. येथे ता. ९ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होती. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करून सोयाबीन विक्री केली. परंतू, अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही सोयाबीन शिल्लक आहे. दरम्यान, ता. ६ फेब्रुवारीपर्यंत खरेदीची मुदत देण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी संपली. एकीकडे सोयाबीनला बाजारात भाव नाही आणि दुसरीकडे हमीभाव केंद्राकडून खेरदीची मुदत संपल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मर्यादा वाढविण्याची गरज


नाफेड कडून प्रतिहेक्टरी पाच क्विंटल ९० किलो सोयाबीन खरेदीचे आदेश मागे घेऊन त्या ऐवजी हेक्टरी १४ क्विंटल सोयाबीन खरेदीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी बेलखेड फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष ॲड.सुधाकर खुमकर यांनी केली आहे.

Soybean MSP News
Nitin Gadkari : ''दोन्ही दादांनी मिळून चांदणी चौकाचे नाव ठरवावे, मी मंजुरी देतो'' नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पीक कापणी अहवालानंतर जो गोषवारा सादर केला त्यात जिल्ह्यातील सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी १४ क्विंटल एवढी दर्शविलेली आहे. तेल्हारा तालुक्यात तर ही उत्पादकता हेक्टरी १७ क्विंटल एवढी आहे. असे असताना नाफेड कडून अत्यल्प सोयाबीन खरेदीचे आदेश असल्याने शेतकऱ्यांना त्याचा काहीही लाभ होणार नाही. (Latest Marathi News)

मुदतवाढीसाठी पणन मंत्र्यांना विनंती


शासनाने हवीभावामध्ये सोयाबीनची खरेदी करण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत मंगळवारी संपली. अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार तसेच सहकार पणन विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्याकडे केली आहे.

Soybean MSP News
Mumbai Temperature: मुंबईकरांनो सावधान! उष्णतेपासून वाचण्यासाठी 'हा' सरकारला वेक अप कॉल, नाहीतर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com