

Faizan Khatib Arrested: नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका युवकाला अटक केली आहे. त्याचा मागील दहा दिवसांपासून शोध सुरु होता. अखेर तो त्याच्या घरातूनच लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी फैजान खतीब नावाच्या तरुणाला अटक केली आहे. १७ मार्च रोजी नागपूरच्या महाल भागात दंगल घडवण्यासाठी लोकांना चिथावल्याचा आरोप फैजानवर आहे.