Voter List:मोहम्मद अशरफ बनले श्रीकृष्ण चव्हाण! मतदार यादीमध्ये मोठा घोळ; नावासमोर भलत्याचाच फोटो, मतदारांकडून तीव्र संताप

लोकसभा निवडणुकीचे मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वॉर्ड, मोहल्ल्यातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचे दिसून येत आहे.
Nagpur
Nagpur Esakal

Voters List Photo Mismatch Loksabha Election: लोकसभा निवडणुकीचे मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वॉर्ड, मोहल्ल्यातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एकाचा फोटो तर त्याच्या खाली दुसऱ्याचेच नाव दिसून येत आहे. असा प्रकार मतदारयादीत आपले नाव बघायला गेलेल्या मतदात्यांना दिसून आला. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करीत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

कुठलीही निवडणूक म्हटल्यावर मतदारयादी निवडणूक ओळखपत्रासह इतर काही आवश्यक शासकीय ओळख देणारा पुरावा मतदान करताना वापरता येतो. तशी मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. परंतु मतदारयादीतच चुकीचा फोटो व दुसऱ्याचे नाव आले असल्याने तारांबळ उडाली आहे.

शहरातील समाजसेवक हाजी मोहम्मद अशरफ, त्यांचे बंधू मोहम्मद सलीम व परिवारातील सदस्यांच्या फोटोखाली इतर दुसऱ्यांचे नाव आल्याचा प्रकार मतदारयादीतून पुढे आला आहे. दुसरीकडे त्यांचा फोटो आणि त्यांचे योग्य नावसुद्धा आहे. अर्थात दोन वेळा मतदारयादीत त्यांचा फोटो वापरला गेला. त्यामुळे इतरही मतदार आता आपले नाव मतदारयादीत फोटोसह तपासत असल्याचे चित्र आहे.

Nagpur
Nagpur: नागपुरात MBBS विद्यार्थ्याने स्वत:ला कोंडल्याने खळबळ, कारण काय? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com