नागपूर : मंगळवारी २२ जलकुंभावरून पाणी बंद

नव्या जलकुंभाला पाइपलाइन जोडणी; चार झोनमधील वस्त्यांना फटका
Nagpur Water supply cut from 22 water tanks
Nagpur Water supply cut from 22 water tankssakal

नागपूर : अमृत योजनेंतर्गत गिट्टीखदान येथे तयार करण्यात आलेल्या जलकुंभाला जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. ही कामे येत्या ३१ मे रोजी करण्यात येणार असल्याने २२ जलकुंभातून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामाचा चार झोनमधील वस्त्यांना फटका बसणार आहे.

पश्चिम नागपुरातील रामदेवबाबा टेकडी परिसरात नवे जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाला पाणीपुरवठ्यासाठी १२०० मिलिमीटर जलवाहिनीवरून नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम ३१ मे रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू होणार आहे. ही कामे १ जूनला सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे महापालिका व ओसीडब्लूने एका दिवसाचे ‘शटडाऊन’ घेतले आहे. त्यामुळे धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमाननगर मंगळवारी झोनमधील २२ जलकुंभाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहणार

  • धरमपेठ झोन : सेमिनरी हिल, रामनगर, रायफल लाईन,

  • फुटाळा लाईन जलकुंभ

  • लक्ष्मीनगर झोन : गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, त्रिमूर्तीनगर, टाकळी सिम, जयताळा, लक्ष्मीनगर (नवीन) जलकुंभ

  • हनुमान नगर झोन : चिंचभवन, नासुप्रचे जलकुंभ.

  • मंगळवारी झोन: गिट्टीखदान, दाभा जलकुंभ, टेकडीवाडी जलकुंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com