Nagpur Weather Update : उकाड्याने दोन मतदान अधिकाऱ्यांना भोवळ; एकाच दिवशी ४८३ जणांना लागले ऊन

उकाडा अचानक वाढल्याने मतदानासाठी व्यवस्थेत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना भोवळ आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ग्रामीण तब्बल ४८३ नागरिकांना ऊन लागल्याने उपचार घ्यावे लागले.
Nagpur Weather Update
Nagpur Weather UpdateSakal

नागपूर : उकाडा अचानक वाढल्याने मतदानासाठी व्यवस्थेत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना भोवळ आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ग्रामीण तब्बल ४८३ नागरिकांना ऊन लागल्याने उपचार घ्यावे लागले.

नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावरील दोन निवडणूक मतदान अधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.१८) भोवळ आली. या दोघांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. अधिकारी अनुजा वाघमारे (वय ४२) या दीक्षाभूमी येथील कुर्वेज न्यू मॉडेल स्कूल येथे कर्तव्यावर होत्या. दुपारी १२.३० च्या त्यांना उन्हामुळे भोवळ आली. त्यांना रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये दाखल केले गेले.

प्रकृती स्थिर झाल्यावर दुपारी ३.२० वाजता त्यांना सुटी दिली गेली. दुसऱ्या घटनेत याच केंद्रावरील मनोज चौधरी यांना भोवळ आली. त्यांना दुपारी २.१० वाजता मेडिकलमध्ये दाखल केले. औषधोपचार करून त्यांना दुपारी अडीच वाजता सुटी देण्यात आली.

उन्हाचा तडाखा वाढल्याने रुग्णांची वाढ

नागपुरात एकाच दिवशी शासकीय रुग्णालयातील ओपीडीत ४८३ रुग्णांची नोंद झाली. मेडिकल, मेयोतील बाह्यरुग्ण विभागात रुग्ण वाढले आहेत. नागपूरसह पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीसह वर्धेत तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्यात पूर्व विदर्भातील शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात एकाच दिवशी १ हजार ८३६ रुग्णांची नोंदणी झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत.

कॅशलेस उपचाराचे निर्देश

नागपुरातील गुरुवारचे तापमान ४१ अंशावर गेले. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश दिले. कर्तव्यावरील निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना समस्या निर्माण झाल्यास जवळच्या कुठल्याही रुग्णालयात ''कॅशलेस'' उपचार देण्याच्याही सूचना मनपा व सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्या.

शासकीय रुग्णालये अलर्ट मोडवर

निवडणूक काळात आरोग्य विभागासह, मेयो, मेडिकल आणि खासगी रुग्णालय ''अलर्ट'' मोडवर आहेत. मात्र आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उकाडा सहन न झाल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची नोंद होत आहे.

मात्र नागपूर महापालिका हद्दीतील शासकीय रुग्णालय, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील बाह्यरुग्ण विभागात एकाही बाह्य रुग्णाची नोंद नाही. त्यामुळे येथील रुग्णांच्या नोंदीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जिल्हा -रुग्ण

नागपूर -४८३

वर्धा- ९७२

चंद्रपूर -३१४

भंडारा ०००

गोंदिया --०६७

गडचिरोली -०००

नागपूर (शहर) -०००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com