Yavatmal Crime: वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यास अटक, पुसद पोलिसांची कारवाई; राहत्या घरातूनही जप्त केला दुकाचीसह ऐवज

Yavatmal Vehicle Battery theft Case: पुसद येथील जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या मैदानात उभ्या करण्यात आलेल्या तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यास पुसद शहर पोलिसांनी अटक केली.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

Yavatmal Vehicle Theft Crime: पुसद येथील जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या मैदानात उभ्या करण्यात आलेल्या तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यास पुसद शहर पोलिसांनी अटक केली. येथील सुभाष वॉर्डातील रहिवासी मनीष साळुंके यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष वॉर्डमधील घराच्या जवळच जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या मोकळ्या जागेत एकूण तीन ट्रॅक्टर्स उभे करण्यात आलेले होते. चोरट्याने गेल्या २९ फेब्रुवारीला या तिन्ही ट्रॅक्टरच्या बॅटरीज लंपास केल्या. त्यात योगेश सुभाष जाधव (रा. श्रीरामपूर) यांच्या ट्रकची बॅटरी व डिक्स, पवन संजय तोंडारे (रा. शिवाजी वॉर्ड, पुसद) यांचे टाटा एस टेम्पोची बॅटरी, मारोती नारायण शिंदे (रा. नवीन पुसद) यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण सहा बॅटऱ्या व एक डिस्क एकूण ४४ हजार २०० रुपये किंमतीच्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.

दरम्यान, पुसद शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी डीबी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डीबीचा स्टाफ यांना सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक लोहकरे व चमूने चोरट्यांचा शोध घेतला. तपासादरम्यान प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कृष्णा भगवान इंगळे (वय २६, रा. लोणदरी) याने सदर बॅटऱ्या चोरल्याचे निष्पन्न झाले. म्हणून सोमवारी (ता.४) तो पुसद येथील लोहार लाईनमध्ये आल्याची माहिती मिळाली. (Latest Marathi news)

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला व आरोपीला अटक केली. त्याच्या लोणदरी येथील राहत्या घरी तीन बॅटऱ्या व लोखंडी डिक्स, चोरीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा एकूण ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलिस हवालदार प्रफुल्ल इंगोले, पोलिस नाईक मनोज कदम, पोलिस कॉन्स्टेबल सिद्धोधन बाभूळकर यांनी ही कारवाई केली.

Nagpur Crime
Ladakh: लडाखमध्ये 'कलम 371' लागू करण्याचा अमित शाहांचा प्लॅन? जाणून घ्या काय आहे तरतूद?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com