नागपूर : जिल्हा परिषद लॉन देणार किरायाने

बांधकाम समितीत निर्णय; खोल्यांचे दर नव्याने होणार निश्चित
Nagpur Zilla Parishad provide lawn for rent construction committee Decision
Nagpur Zilla Parishad provide lawn for rent construction committee Decisionsakal

नागपूर : उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जिल्हा परिषदेकडून पावले उचलण्यास सुरवात करण्यात आली आहे. सरपंच भवन येथील लॉन एजेंसीला देण्याऐवजी जिल्हा परिषद स्वतःच संचलित करून किरायाने देणार आहे. यासाठी त्याच भाव तसेच खोल्यांचे दर नव्याने निश्चित करण्यात येणार आहे. बांधकाम समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती सुमित्रा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक पार पडली. सरपंच भवन येथील लॉन जि.प. स्तरावरुनच विवाह, स्वागत समारंभ आदी कामांसाठी भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास पाच वर्षांपूर्वी या जागेवर लॉनकरता २५ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून सपाटीकरण करण्यासोबतच स्टेज, वॉल कंपाउंड, रुम्स आदींचे बांधकाम झाले.

विद्यमान पदाधिकाऱ्यांनी या लॉनसाठी टेंडर करून एजन्सी नियुक्त मार्फत तो चालविण्यासाठी देण्यावर विचार केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यावर अमलच झाला नाही. त्यामुळे आता जि.प. स्वतःच लॉन किरायाने देणार आहे. सभागृह, प्रशिक्षण हॉल, कॉन्फरन्स हॉल याशिवाय १४ ते १५ रुम्स या भाडेतत्त्वावर देण्यात येत. या सर्वांचे दर २००७ पासून आहे तेच आहे. त्यामुळे आता यांच्या दरामध्ये वाढ करण्याचे बैठकीतून निश्चित करण्यात आले. तसेच साई मंदिर परिसरातील कृषी मॉलसाठी जि.प. ने शासनाकडे निधीची मागणी केली असून, मॉलसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com