Old Pension Scheme: जुन्या पेंशनचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही! वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती

ZP Employee Excluded from Old Pension Scheme: राज्य शासनाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेला जुनी पेंशनबाबतचा शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही, अशी माहिती वित्त विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
Old Pension Scheme: जुन्या पेंशनचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही! वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती

Old Pension Scheme not available for ZP Employee: राज्य शासनाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेला जुनी पेंशनबाबतचा शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही, अशी माहिती वित्त विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. याबाबत वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामठे यांनी शपथपत्र दाखल केले. त्यामुळे प्रत्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे कर्मचारी, जि. प. शाळांतील शिक्षक, ग्रामसेवक अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला याचा फटका बसणार आहे.

शैलेंद्र कोचे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेंशन योजना लागू करावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत विनंती केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलीका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. १ नोव्हेंबर २००५ नंतर जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली. (Latest Marathi News)

मात्र, केंद्र शासनाने ३ मार्च २०२३ रोजी कार्यालयीन आदेश जारी करीत १ नोव्हेंबरनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याबाबत विकल्प देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. याच धर्तीवर राज्यातही १ नोव्हेंबर पूर्वी भरती प्रक्रीया सुरू झालेल्या व त्यानुसार, १ नोव्हेंबरनंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशनचा लाभ मिळेल, असा निर्णय राज्य शासनाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतला.

Old Pension Scheme: जुन्या पेंशनचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही! वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती
Mumbai News: गोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग; 25 ते 30 घरे जळून खाक

परंतु, वित्त विभागाचा हा शासन निर्णय केवळ राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे. त्याचा लाभ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही, असा खुलासा वित्त विभागाने शपथपत्रात केला आहे. वित्त विभागाने प्रतिज्ञापत्र दिल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्यात अडचण तयार झाली आहे. याचा फटका प्रत्यक्ष जिल्हा परिषदेत काम करणारे कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला बसणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली. (Latest Marathi News)

Old Pension Scheme: जुन्या पेंशनचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही! वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती
Pune News: ससून रुग्णालयातून पळालेल्या आरोपी मार्शल लुईसला अटक; शरद मोहोळच्या पत्नीला केली होती शिवीगाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com