esakal | लहान मुलांच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर मिळेना, परिचारिका पदासाठी मात्र ७५ अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

लहान मुलांच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर मिळेना, परिचारिका पदासाठी मात्र ७५ अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : येणाऱ्या काळात कोरोनाचा (coronavirus) संसर्ग लहान मुलांना होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेने (nagpur zp) ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (पीएचसी) लहान मुलांकरिता चाइल्ड कोविड केअर सेंटर (सीसीसी) (covid care center) उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी कंत्राटी तत्वावर डॉक्टरसह परिचारिका भरतीची जाहिरात आरोग्य विभागाकडून काढण्यात आली. परिचारिका पदासाठी ७५ वर अर्ज आले असून बालरोग तज्ज्ञ (पेडियाट्रीक,एमबीबीएस) मिळत नसल्याचे चित्र आहे. (nagpur zp not getting doctor for child covid care center)

हेही वाचा: तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातील प्रत्येकी एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १० खाटांमध्ये चाइल्ड कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. या निर्णयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केले. जिल्हा आरोग्य विभागाने या सीसीसीकरिता जवळपास ७ कोटीवर खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आजवर बीएएमएस डॉक्टरचे ३, बीडीएस १, औषध निर्माण अधिकारी पदासाठी २, परिचारिका व अधिपरिचारिका पदासाठी ७५ वर अर्ज आले आहेत. परंतु एकाही एमबीबीएस डॉक्टरने अर्ज केलेला नाही. विशेष म्हणजे, या कंत्राटी तत्त्वावरील डॉक्टरांना मानधनही चांगले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु यानंतरही जि.प.च्या सीसीसीकरिता एकाही एमबीबीएस डॉक्टरने अर्ज केलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.