esakal | सामाजिक बांधिलकी : नागपूरचा बाइकर निसर्ग बेलखेडे वाटतोय देशभर मास्क!
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक बांधिलकी : नागपूरचा बाइकर बेलखेडे वाटतोय देशभर मास्क!

सामाजिक बांधिलकी : नागपूरचा बाइकर बेलखेडे वाटतोय देशभर मास्क!

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोनाच्या लाटेत एकीकडे तरुणमंडळी मास्क न घालता मोकाट फिरताना दिसतात. त्याचवेळी काही तरुण असेही आहेत, जे संवेदनशील वागून सामाजिक बांधिलकीही जपतात. निसर्ग बेलखेडे हा असाच एक झपाटलेला तरुण आहे. बाईक रायडिंगच्या निमित्ताने देशभर भ्रमंती करीत जागोजागी मास्क व सॅनिटायझर वितरित करून कोरोनाबद्दल जनजागृती करीत आहे. (Nagpurkar-Nisarg-Belkhede-distribute-a-mask-all-over-the-country)

नरसाळा परिसरातील इंद्रनगर येथे राहणारा व बाईक रायडिंगचा शौकीन असलेला निसर्ग दरवर्षी जनजागृती व सामाजिक संदेश देण्यासाठी रायडिंग करतो. आतापर्यंत त्याने पुणे, चित्रकूट, विशाखापट्टणम, पुरीसह अनेक ठिकाणी बाईकने जाऊन आलेला आहे. यावेळी त्याने लेह-लडाखवारीचे शिवधनुष्य उचलले आहे. २५ वर्षीय निसर्ग सध्या जालंधर (पंजाब) येथे असून, लवकरच पुढच्या प्रवासाला निघणार आहे. निसर्गसोबत राजस्थानचा एक आणि जबलपूरचे दोन रायडर्स पंजाबमधून जॉईन झाले आहेत.

हेही वाचा: शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

सध्याच्या कठीण काळात कोरोनाबद्दल देशवासीयांमध्ये जनजागृती करणे, हा निसर्गच्या साहसी उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. प्रवासादरम्यान तो गावागावांत जाऊन तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधतो. त्यांना मास्क, सॅनिटायझर, साबण भेट देऊन कोरोनाला हरविण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन करतोय.

त्याने आतापर्यंत गरजूंना दोन हजारांवर मास्क व सॅनिटायझर मोफत वाटले आहेत. त्याच्या या अनोख्या उपक्रमाची जागोजागी स्तुती होत असल्याचे निसर्गने सांगितले. जवळपास आठ हजार किमीची ही मोहीम अठरा दिवस चालणार आहे. भविष्यातही अनेक आव्हानात्मक साहसी मोहिमेवर जाण्याचा मनोदय त्याने बोलून दाखविला.

हेही वाचा: कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

कोरोना भारतात आल्यानंतर बाईक रायडर म्हणून माझ्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याचा विचार आला. गोरगरिबांसाठी जागोजागी अन्नदान झाले किंवा सुरू आहे. त्यामुळे मी मास्क, सॅनिटायझर व साबण वाटण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने रायडिंगसोबतच माझ्या हातून समाजसेवाही घडत आहे, याचा सर्वस्वी आनंद आहे.
- निसर्ग बेलखेडे, युवा बाईक रायडर

(Nagpurkar-Nisarg-Belkhede-distribute-a-mask-all-over-the-country)

loading image