esakal | नागपूरकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

नागपूरकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा’ हे गीत सर्वांच्याच आवडीचे. कुणी सोबत करो अथवा न करो; परंतु सावली अशी गोष्ट आहे, जी आयुष्याच्या शेवटपर्यंत मनुष्याची सोबत करत असते. मात्र, कधी कधी हीच विश्‍वसनीय सावली आपली साथ सोडते. तो दिवस म्हणजे शून्य सावली दिवस (Zero shadow day) अर्थात ‘झीरो शॅडो डे’ होय. हा अनोखा खगोलीय अनुभव नागपूरकरांनी बुधवारी दुपारी अनुभवला. (Nagpurkars experienced zero shadow day)

आयुष्यात सावली कधीच आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. परंतु, वर्षातून दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी सावलीच साथ सोडते. काही क्षणापुरती का होईना सावली गायब होते. हा बिनसावलीचा दिवस नागपुरात बुधवारी, २६ मे रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी अनुभवायला मिळाला. दुपारच्या सुमारास बच्चेकंपनीसह अनेकांनी घराबाहेर उन्हात उभे राहून शून्य सावलीचा अनुभव घेतला. शहरात जागोजागी हे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा: Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

सूर्य डोक्‍यावर आल्यानंतर उन्हात उभे राहिलेल्या व्यक्तीची अथवा वस्तूची सावली थेट पायाखाली आल्याचे पाहायला मिळाले. काही मिनिटांसाठी सावली गायब झाली होती. या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत ‘झीरो शॅडो’ अर्थात शून्य सावली असे म्हटले जाते. या दिवशी आपण राहतो ते ठिकाण सूर्य आणि पृथ्वीचा मध्य एका रेषेत येतात. सध्या उत्तरायण असल्यामुळे नागपूरसह राज्यात ३१ मेपर्यंत ठिकठिकाणी शून्य सावली अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यातही शून्य सावली अनुभवता येणार आहे.

(Nagpurkars experienced zero shadow day)