esakal | Nagpur: जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम; पैसेवारी ५० पेक्षा जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम; पैसेवारी ५० पेक्षा जास्त

नागपूर जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम; पैसेवारी ५० पेक्षा जास्त

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : जास्त पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले असून मंत्र्यांकडून पंचनामे करण्याची भाषा होत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या दरबारी पीक परिस्थिती उत्तम दर्शविण्यात आली. प्रशासनाने काढलेल्या नजर अंदाज पैसेवारीत सर्वच गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सर्वेच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. काही काळ झालेल्या पावसानंतर त्यात खंड पडला. यामुळे सुरुवातीला पेरणी करण्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन यंदा चांगली होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु नंतरच्या काळात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीनसह इतरही पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यानच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळेने शेतपिकांचे नुकसान झाले. तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. घर व पशु नुकसानीचा मदत निधी मिळाला. परंतु शेत पिकांच्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही.

हेही वाचा: औरंगाबाद : शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण अनिवार्य

पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नुकसानीचा मुद्दा मुख्यमंत्री दरबारी उचलून धरल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी याबाबत बैठकीतही घेतली. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सरकारकडून मान्य करण्यात आले असून पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

जिल्हाप्रशासनाच्या महसूल यंत्रणेकडून खरीप हंगामातील नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात १७७५ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड केली जाते. प्रशासनाने या सर्व गावांची नजर अंदाज पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविली आहे. विरोधी पक्षाकडून नजर अंदाज पैसेवारीच्या आधारे मदत देण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील एक गावात नुकसान दर्शविण्यात आले नसल्याचे त्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येते.

loading image
go to top