Nagpur : बिबट्याला लागले वेड ‘चांदणीबर्डी’चे

गेल्या एक वर्षांपासून या भागात वावर, वन विभागाचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Leopard
LeopardSakal

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी शिवारात गेल्या एक वर्षापासून बिबट्याचा वावर असून शेतकऱ्यानंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतीवर जाण्याची भीती शेतकरी व शेतमजूर यात पसरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे ओल्या दुष्काळी परिस्थितीतून कसे बसे सावरत शेतकरी आता कुठे रब्बीच्या तयारीत लागला आहे. अशात या संकटाने तो त्रस्त झाला आहे.

गुरूवारी (ता.६) रात्री चांदणीबर्डी येथे रात्री एक च्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. शंकर टेकाडे यांचे घर गावाच्या सुरूवातीला आहे. त्यांची सर्व जनावरे घराबाहेर बांधलेली असतात. कुत्र्यांचा जोराचा भूकण्याचा आवाज येत असल्याने शंकर यांनी खिडकीतून बघितले तर बिबट बाहेर बांधलेल्या वासराजवळ येत होता. ते पाहून शंकरने लगेच आरडाओरड केली असता बिबट तेथून पळून गेला.

शंकरच्या ओरडण्याचा आवाज येऊन आजूबाजूने लोक घराबाहेर आले. शंकरने त्यांना झालेला प्रकार सांगितला. सर्व नागरिक रात्रभर तिथे कचरा पेटून जागे राहले. या भागातील नागरिकांना गेल्या एक वर्षांपासून बिबट दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने तीन कुत्र्यांची शिकार केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.

आता तर चक्क बिबट्याने गावात प्रवेश केल्यामुळे गावामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे करायची कशी, रात्रीच्या वेळेस महत्त्वाचे काम आल्याने घराबाहेर जायचे कसे, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. बिबट या भागात असल्याबाबतची माहिती कितेकदा वनविभाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आली.

परंतु कसल्याही उपाययोजना वन विभागामार्फत आजपर्यंत करण्यात आल्या नाही. हा भाग जंगली असल्यामुळे बिबटचा वावर या भागात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले तसेच रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडू नये, शेतात एकटे न जाता गृपने जावे, जनावरे बाहेर बांधू नये अशा सूचना यापूर्वी वन विभागाकडून गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जीव घेतल्यावर येईल का जाग?

बिबट दिसला की काही दिवस वन विभागाचे कर्मचारी त्या भागात रात्रीच्या वेळेस गस्त घालतात व थोडे दिवस झाले की बंद करतात. परंतु कायमची उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या शेतकऱ्याचा किंवा गावकऱ्यांचा बिबट्याने जीव घेतल्यावर वन विभागाला जाग येईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. आता तर बिबट्याने चक्क गावात प्रवेश करायला सुरवात केली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com